Minister Sanjay Shirsat : नाशिकमधील 'टीसीएस'प्रकरण म्हणजे धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्जचे रॅकेट, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा

मुंबई : "नाशिकच्या 'टीसीएस' कंपनीतील धर्मांतर प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नसून, यात धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्जचा व्यापार असे 'थ्री-स्टेज' रॅकेट सक्रिय आहे," असा खळबळजनक दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsat) यांनी शनिवारी केला. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल (Mateen Patel) यांना वाचवण्यासाठीच असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) आले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.


माध्यमांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले की, ही यंत्रणा तीन पातळ्यांवर काम करते. धर्मांतर करणे, लव्ह जिहाद आणि ड्रग्जचा व्यापार करून इतर समाजातील तरुणांना नशेखोर करणे, अशा तिन्ही स्तरांवर हे षड्यंत्र रचले जात आहे. एमआयएमचे (MIM0नेते कुणाचे तरी मोहरे असून, या प्रकरणाचा तपास केल्यास मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट बाहेर येईल. महाराष्ट्रात सध्या जे घडत आहे, ते 'काश्मीर फाईल्स' प्रमाणेच अत्यंत गंभीर आहे, असेही त्यांनी नमूद केले.


शिरसाट म्हणाले, "निदा खानला नाशिकला कुणी पाठवले याचा खुलासा झाला पाहिजे. इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी तिची नाशिकला जाऊन भेट घेतली होती आणि एमआयएमच्या नगरसेवकाला तिला घर देण्यासाठी भाग पाडले होते. आरोपींना फरार करणे आणि पुन्हा पोलिसांना पुरावे मागणे, हे सर्व नियोजनबद्ध सुरू आहे," असा दावा शिरसाट यांनी केला.



एसआयटी चौकशीची मागणी


या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. नगरसेवक मतीन पटेलसह त्याला मदत करणाऱ्या सर्वांना पोलीस बेड्या ठोकतील. नाशिक पोलिसांनी दबावाखाली न येता कारवाई करावी, सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निदा खानचे कुटुंब समोर येत नसताना एमआयएमचे नेते इतके आक्रमक का होत आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.



निदा खानला ११ मेपर्यंत पोलीस कोठडी


दरम्यान, टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) दाखल गुन्ह्यात संशयित निदा एजाज खान (Nida Khan) हिला अटक करून शुक्रवारी (दि. ८) दुपारी नाशिकरोड न्यायालयात (Nashik Road Court) हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांनी मांडलेले गंभीर मुद्दे आणि तपासातील प्रगती विचारात घेता, न्यायालयाने निदा खानला ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने