Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला NADA ची नोटीस; कारवाईची शक्यता, महिला क्रिकेटपटू शेफाली वर्माही अडचणीत

जयपूर : यंदाच्या आयपीएल मोसमात वादांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज काही ना काही वाद समोर येत आहेत. नुकतेच युझवेंद्र चहल विमानात ई-सिगारेट वापरताना दिसल्याने क्रिकेटविश्वात मोठी चर्चा रंगली होती. आता National Anti-Doping Agency (नाडा) ने भारतीय क्रिकेटमधील दोन खेळाडूंना नोटीस पाठवली आहे. डोपिंग चाचणीसाठी उपस्थित न राहिल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. हे दोन खेळाडू म्हणजे यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा. सध्या यशस्वी जयस्वाल हा राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. तर शेफाली वर्मा ही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळत आहे. ती सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे.


नोटीस का पाठवली?


National Anti-Doping Agency (नाडा) ने यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या दोन्ही खेळाडूंना डोपिंग चाचणीसाठी गैरहजर राहिल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांच्या ठिकाणासंबंधी आवश्यक माहिती न दिल्यामुळेही कारवाई करण्यात आली आहे. दोघांनाही स्पष्टीकरण देण्यासाठी अंतिम संधी देण्यात आली आहे. नियमांनुसार, एखादा खेळाडू एका वर्षाच्या कालावधीत तीन वेळा डोपिंग चाचणीसाठी गैरहजर राहिला तर त्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घालण्यात येऊ शकते.



काय आहे संपूर्ण प्रकरण?


National Anti-Doping Agency च्या माहितीनुसार, गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी यशस्वी जयसवाल याची डोपिंग चाचणी करण्यासाठी उत्तेजक नियंत्रण अधिकारी तो ज्या शहारत होता त्याच शहारत गेले होते. पण चाचणीसाठी यशस्वी जयस्वाल गैरहजर होता. त्याचप्रमाणे शेफाली वर्मा हिची चाचणी ७ नोव्हेंबर रोजी होणार होती, पण ती देखील त्या वेळी गैरहजर होती. या प्रकरणात दोघांकडून १८ आणि २० फेब्रुवारी रोजी स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. मात्र त्यांच्या बाजूने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाडाने त्यांना डोपिंग चाचणीसाठी गैरहजर राहिल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून