BMC News : महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर, आता नगरसेवकांना विकास निधी वापरण्याचे खाते झाले खुले !

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मांडलेले सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिका सभागृहात सुचवलेल्या सुधारणांसह शुक्रवारी ८ मे २०२६ रोजी मंजूर झाले. या मंजूर अर्थसंकल्पानुसार, महानगरपालिका सदस्यांना विकास कामांकरिता द्यावयाचा निधी महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ सॅप प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये आणि महानगरपालिका सभेमध्ये नगरसेवकांनी सुचवलेल्या नागरी सेवा सुविधा आणि स्थानिक विकास कामांना गती मिळणार आहे.


ही तत्पर कार्यवाही केल्याबद्दल मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदा जानेवारी २०२६ मध्ये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यानंतर महापौर, उप महापौर पदाची तसेच पाठोपाठ विविध वैधानिक, विशेष आणि समित्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. त्यादरम्यान महानगरपालिका प्रशासनाने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आर्थिक वर्ष २०२६-२०२७ चे अर्थसंकल्पीय अंदाज सादर केले. विहित प्रक्रियेनुसार अर्थसंकल्पावर स्थायी समितीमध्ये चर्चा होवून, आवश्यक त्या सुधारणा करून स्थायी समितीने सुधारित अर्थसंकल्प महानगरपालिका सभेसमोर ठेवला.



महानगरपालिका सभेमध्ये देखील १२ दिवसाच्या चर्चेनंतर ३० एप्रिल २०२६ रोजी अर्थसंकल्पातील उत्पन्नाची बाजू मंजूर करण्यात आली. तर ८ मे २०२६ रोजी उपसूचनांसह खर्चाची बाजू मंजूर करण्यात आली. अशा रीतीने संपूर्ण अर्थसंकल्पास सुधारणांसह महानगरपालिका सभेने मंजुरी दिली आहे. आजवरच्या नियमित प्रक्रियेनुसार अर्थसंकल्प आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मंजूर होणे अपेक्षित असते. तरीही, यंदा निवडणुका व त्यानंतरच्या प्रक्रियांमुळे अर्थसंकल्प मंजुरीस अधिक कालावधी लागला.


ही बाब लक्षात घेता आणि महानगरपालिका सदस्यांनी सुचविलेल्या स्थानिक विकासकामांना गती देण्याची आवश्यकता पाहता, सुधारणा झालेला अर्थसंकल्प तत्काळ कार्यान्वित करणे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी निर्देश दिले होते की, सुधारणांचा अर्थसंकल्प सॅप प्रणालीवर तत्काळ उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून संबंधित विभागांना तत्काळ प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून स्थानिक विकास कामांची अंमलबजावणी सुरू करता येईल.



त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सह आयुक्त (वित्त) देविदास क्षीरसागर, उप आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रमुख लेखापाल (वित्त) अरुण जाधव यांच्या देखरेखीखाली महानगरपालिकेच्या वित्त विभागाने, शुक्रवार ८ मे २०२६ रोजी रात्री उशिरापर्यंत कार्यरत राहून सॅप प्रणालीवर सुधारणांचा अर्थसंकल्प अपलोड केला. महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या या तत्पर कार्यवाहीमुळे मुंबईतील विविध स्थानिक विकासकामांना गती मिळणार आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने