H-1B visa : अमेरिकेत एच-1बी व्हिसाधारकांच्या वेतनात 30% वाढीचा प्रस्ताव; भारतीय व्यावसायिकांवर परिणामाची शक्यता

अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने एच-1बी व्हिसाधारकांच्या किमान वेतनात तब्बल ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. अमेरिकन नागरिकांच्या रोजगार आणि वेतनहितांचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे, जेणेकरून परदेशी कामगार कमी वेतनावर अमेरिकन नागरिकांची जागा घेऊ शकणार नाहीत.


कामगार विभागाच्या मते, सध्याचे वेतनमान जवळपास २० वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आले होते आणि आजच्या परिस्थितीत ते अप्रासंगिक ठरत आहेत. ‘इम्प्रूव्हिंग वेज प्रोटेक्शन’ या नव्या प्रस्तावाअंतर्गत एंट्री-लेव्हलपासून अनुभवी व्यावसायिकांपर्यंत सर्व चार वेतन श्रेणींमध्ये वाढ करण्यात येणार आहे.



पूर्वी एंट्री-लेव्हल (लेव्हल-1) कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन ७३,२७९ डॉलर होते, ते वाढवून ९७,७४६, डॉलर करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे, सर्वाधिक अनुभवी व्यावसायिकांसाठी (लेव्हल-4) वेतन १,४४,२०२ डॉलरवरून १,७५,४६४ डॉलरपर्यंत वाढू शकते. हा बदल केवळ एच-1बीपुरता मर्यादित नसून एच-1बी1, ई-3 आणि प्रोग्राम इलेक्ट्रॉनिक रिव्ह्यू मॅनेजमेंट (PERM) यांसारख्या कार्यक्रमांनाही लागू होणार आहे.


या प्रस्तावामुळे उद्योग क्षेत्रात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. तज्ज्ञांच्या मते, वेतनातील या मोठ्या वाढीमुळे लहान कंपन्यांसाठी परदेशी प्रतिभावान उमेदवारांना, विशेषतः फ्रेशर्सना, नियुक्त करणे अत्यंत कठीण होऊ शकते.



या प्रस्तावावर २६ मेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांकडून मते मागवण्यात आली आहेत. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्येही डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अशाच प्रकारचे बदल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कायदेशीर आव्हानांमुळे तो निर्णय रोखण्यात आला होता.


अलीकडेच, सप्टेंबर २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्षीय आदेशाद्वारे एच-1बी उमेदवारांवर एक लाख डॉलर शुल्क लावण्यात आले होते. आता वेतनवाढीचा हा नवा प्रस्ताव परदेशी व्यावसायिकांसाठी अमेरिकेतील संधींचा मार्ग आणखी कठीण करणारा ठरू शकतो.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे