SSC : दहावी परीक्षेतील गुणवंतांच्या शिक्षण समिती अध्यक्षा, महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या शालांत माध्यमिक म्हणजेच दहावीच्या (एसएससी) परीक्षेत महानगरपालिकेच्या २४६ माध्यमिक शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा महानगरपालिका मुख्यालयात शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सोमवारी ११ मे २०२६ रोजी गौरव केला. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या छोटेखानी समारंभास शिक्षण समिती सदस्य, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी किर्तीवर्धन किरतकुडवे आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.



शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दहावीचा अभ्यास केला, वेळेचे नियोजन कसे केले, यापुढे कोणत्या शाखेत प्रवेश घेणार आदी विषयांवर या गौरव समारंभात चर्चा करण्यात आली. सर्व गुणवंतांना यावेळी प्रेरणादायी पुस्तके आणि गुणपत्रक ठेवण्यासाठी फोल्डर भेट देण्यात आली.



मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या (एसएससी) परीक्षेचा निकाल ८ मे २०२६ रोजी जाहीर झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २४६ माध्यमिक शाळांमधून एकूण १५,९०३ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ हजार ६४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महानगरपालिकेच्या शाळांचा सरासरी निकाल ९२.०८ टक्के इतका लागला आहे. एकूण ७७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, ६६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. जी दक्षिण विभागातील सीताराम मिल कंपाऊंड माध्यमिक शाळेतील स्वयं शेखर गोरेगावकर या विद्यार्थ्याने ९७.६० टक्के गुण मिळवून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. के पश्चिम विभागातील डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूलमधील अशिया जाकीर सय्यद या विद्यार्थिनीने ९६.२० टक्के गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच प्रभादेवी मुंबई पब्लिक स्कूलमधील दीपक अरुण तिवारी आणि गोखले रोड मुंबई पब्लिक स्कूलमधील जिनल हरेश सुमेसरा या दोघांनी ९५.८० टक्के गुण प्राप्त करीत तृतीय क्रमांक पटकावला आहे. हे सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने