IPL 2026 Mumbai Indians : तिलक वर्माच्या एका चुकीने मुंबईचं स्वप्न भंगलं! नमन धीरसोबतच्या गैरसमजामुळे सामना फिरला, MI प्लेऑफमधून बाहेर

मुंबई : पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या हंगामाचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाला. रायपूरमध्ये झालेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने अंतिम चेंडूवर २ विकेट्स राखून विजय मिळवत मुंबई इंडियन्सला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकलं. आयपीएल २०२६ मधील ५४ व्या सामन्यात आरसीबीने अखेरच्या क्षणी सामना हिसकावत मुंबईच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला.


प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत १६६ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा बचाव करताना मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच प्रभावी मारा करत सामना पूर्णपणे नियंत्रणात ठेवला होता. मात्र, १८ व्या षटकात घडलेल्या एका चुकीने अख्ख्या सामन्याचं चित्र बदललं.



आरसीबीसाठी क्रुणाल पांड्या एकहाती लढत होता. अल्लाह गझनफरच्या गोलंदाजीवर त्याने मोठा फटका मारला. सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या नमन धीरने अप्रतिम प्रयत्न करत चेंडू मैदानात ढकलला. त्याच्याच जवळ तिलक वर्मा उभा होता. पण नमनचा पाय बाउंड्री रोपला लागला असावा, असा समज झाल्याने तिलकने झेल घेण्याचा प्रयत्नच केला नाही.


मात्र रिप्लेमध्ये स्पष्ट दिसलं की नमनचा पाय रोपला स्पर्श झालाच नव्हता. म्हणजेच तिलकने योग्यवेळी प्रतिक्रिया दिली असती तर क्रुणाल पांड्या त्याच क्षणी बाद झाला असता. हा गैरसमज पाहून नमन धीरही संतापलेला दिसला.


जीवदान मिळाल्यानंतर क्रुणाल पांड्याने त्याच षटकात सलग दोन षटकार ठोकत सामना आरसीबीच्या बाजूने फिरवला. या अतिरिक्त १२ धावाच अखेरीस मुंबईसाठी महागात पडल्या. नंतर तिलक वर्माने क्रुणालचा शानदार झेल घेतला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.



शेवटच्या षटकात मुंबईसमोर १५ धावा वाचवण्याचं आव्हान होतं. मात्र, पहिल्यांदाच अंतिम षटक टाकणाऱ्या राज अंगद बावाला दबाव झेपला नाही. त्याने वाइड आणि नो-बॉलसह तब्बल ५ अतिरिक्त धावा दिल्या. त्यामुळे आरसीबीला विजयाचा मार्ग सोपा झाला.


अखेरीस शेवटच्या चेंडूवर रासिख सलामने धाव घेत आरसीबीला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. जर तिलक वर्मा आणि नमन धीर यांच्यात तो गैरसमज झाला नसता, तर सेट झालेला क्रुणाल पांड्या त्याचवेळी बाद झाला असता आणि आरसीबीसमोर शेवटच्या षटकात जवळपास २५ धावांचं कठीण लक्ष्य उभं राहिलं असतं.


मुंबई इंडियन्सच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तिलक वर्माच्या त्या एका चुकीवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून, हा क्षणच मुंबईच्या हंगामाचा टर्निंग पॉइंट ठरल्याची चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने हुकमी एक्का काढला, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड