Meghna Sakore Bordikar : एकल महिला धोरणासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण आवश्यक

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर


मुंबई : राज्यातील एकल महिलांच्या विविध प्रश्नांचा सर्वंकष विचार करून प्रभावी धोरण तयार करण्यासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण करणे आवश्यक असून, सध्या उपलब्ध असलेल्या सर्वेक्षणांचा उपयोगही धोरण निर्मितीसाठी करण्यात यावा, असे निर्देश महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिले.निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली एकल महिला धोरणासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी धोरणाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.



राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शासकीय योजनांशी संबंधित प्रश्नांचा विचार करून धोरण अधिक परिणामकारक करण्यात यावे. यासाठी समितीमध्ये आणखी सदस्यांचा समावेश करण्यात यावा. तसेच राज्य शासनाच्या विविध १३ ते १४ विभागांचा या विषयाशी संबंध असल्याने सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन समन्वयातून धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी.एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, त्यांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात आणि धोरण राबविताना सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने