Suicide Attack in Bannu : पाकिस्तान हादरला! बन्नूमध्ये भीषण आत्मघाती हल्ला; १५ पोलिस जवान ठार, अनेक जखमी

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात शनिवारी उशिरा रात्री भीषण आत्मघाती हल्ला झाला. एका आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेले वाहन थेट फतेह खेल पोलिस तपासणी नाक्यावर घुसवल्याने प्रचंड स्फोट झाला. या भीषण हल्ल्यात १५ पोलिस जवानांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.


स्फोट इतका तीव्र होता की संपूर्ण तपासणी नाका क्षणार्धात उद्ध्वस्त झाला. परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते. अनेक जवान ढिगाऱ्याखाली अडकले होते. बचाव पथकाने रात्रभर मोहीम राबवत ढिगाऱ्याखालून जखमी जवानांना बाहेर काढले.



बन्नूचे डीआयजी सज्जाद खान यांनी सांगितले की, स्फोटामुळे मोठे नुकसान झाले असून पोलिस चौकी पूर्णपणे कोसळली आहे. जखमी जवानांना तातडीने जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डीआयजींनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि उपचारांचा आढावा घेतला.


या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जवानांची ओळख पटली असून त्यामध्ये रहमत अयाज, सनाउल्लाह, नियाज अली, हबीब, सादुल्लाह जान, कामरान, नूरुल्लाह, आबिद जानी, इमरान, कलीमुल्लाह, सादिकुल्लाह, मुनीर आलम खान, राहतुल्लाह खान आणि फारूक यांचा समावेश आहे. तर मुजरिम फिरोज, हयातुल्लाह आणि कदरुल्लाह हे जवान जखमी झाले आहेत.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. स्फोटामुळे आसपासच्या घरांचे आणि इमारतींचेही मोठे नुकसान झाले. काही घरांची छप्परे कोसळल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.


खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच दोषींना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.



दरम्यान, पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. याआधी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) या संघटनेने बलुचिस्तानातील विविध भागांमध्ये केलेल्या १० हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. खारन, वाशुक, आवारान, केच आणि मस्तुंग भागात सुरक्षा दलांवर हल्ले करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे.


बीएलएफचे प्रवक्ते मेजर ग्वहराम बलुच यांनी सांगितले की, त्यांच्या लढवय्यांनी सैनिकी छावण्या, सुरक्षा ताफे आणि रस्ते बांधकाम कंपनीच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांना लक्ष्य केले. संघटनेने काही ठिकाणी रॉकेट आणि ग्रेनेड लाँचरद्वारे हल्ले केल्याचाही दावा केला आहे. तसेच शस्त्रे जप्त करून सुरक्षा यंत्रणेचे देखरेखीचे कॅमेरे नष्ट केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

USS Abraham Lincoln : थायलंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५ हजार अमेरिकन सैनिकांच्या आगमनापूर्वी पटायातील देहव्यापारावर धाडी

पटाया : थायलंडचे प्रसिद्ध पर्यटन शहर असलेल्या पटाया (Pattaya) मध्ये सध्या पोलिसांकडून देहविक्री करणाऱ्या महिला आणि

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

Nepal Flood Rescue : नेपाळ-तिबेट पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी संपर्क नाही; शोधासाठी केंद्राचे विशेष पथक काठमांडूत दाखल

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.