BMC : महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाला जुन्याच व्हिडीओ वॉलचा आधार

मुंबई : मुंबईतील विविध ठिकाणांवरील महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षातील व्हिडीओ वॉलच्या माध्यमातून लक्ष ठेवला जात असून ही वॉल जुनी झाल्यामुळे नवीन व्हिडीओ वॉल बनवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने परत प्रशासनाकडे पाठवून लावला. या वॉलच्या उभारणीसाठी पात्र ठरलेली कंपनीवर काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया यापूर्वी झाल्यामुळे तसेच अंदाजित दरापेक्षा २२ टक्के कमी दराने ही निविदा भरुन काम मिळवण्या प्रयत्न झाल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी यापूर्वी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची उत्तरे समाधानकारक न दिल्यामुळे हा प्रस्ताव दप्तरी दाखल करत या वॉलच्या उभारणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवला.



मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्ष आणि परळ येथील पर्यायी नियंत्रण कक्ष येथे सध्या बसवण्यात आलेली व्हिडीओ वॉल जुनी झाल्यामुळे नवीन वॉल बसवण्याचा प्रस्ताव यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. यापूर्वी आलेला प्रस्ताव स्थायी समितीने फेरविचारासाठी परत पाठवला होता. परंतु यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा योग्य प्रकारे न दिल्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा पटलावर पुकारण्यात आल्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल अर्थात रेकॉर्ड करण्याची मागणी उपसूचनेद्वारे केली. काळ्या यादीतील ही कंपनी असल्यामुळे काही कंपन्यांना कामे देण्यासाठी आम्ही इथे प्रस्ताव मंजूर करण्याकरता बसलेलो नाहीत, असे सांगत या प्रस्तावाला विरोध केला.



या उपसूचनेला भाजपच्या प्रिती सातम यांनी अनुमोदन देत आपत्कालिन नियंत्रण कक्षातील या व्हिडीओ वॉलद्वारे मुंबईतील आपत्कालिन घटनांवर आपल्या लक्ष ठेवणे योग्य ठरते. या प्रकल्पाचा दर्जा आणि गुणवत्ता ही महत्वाची असल्यामुळे हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला जावा, अशी सूचना केली. यावर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनीही या निविदेची चौकशी करण्याची मागणी केली.



व्हिडीओ वॉलची वैशिष्ट्ये


-व्हिडीओ वॉलवर उपलब्ध असणारे सी सी टिव्ही कॅमेरांद्वारे आपत्ती प्रसंगी मुख्य नियंत्रण कक्षातून लक्ष


-मुंबईतील सुमारे ९ हजार ७०० कॅमेरांचे प्रक्षेपण उपलब्ध


-एकाच वेळी ५० ते ६० कॅमेऱ्यांचे प्रक्षेपण उपलब्ध


-या कॅमेऱ्यांच्या प्रक्षेपणासहित व्हिडीओ बॉलवर भारतीय हवामान खात्याचे संकेतस्थळ, डॉपलर रडार, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संकेतस्थळ, महानगरपालिकेची भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारीत नियंत्रण आणि समादेशन प्रणाली, पावसाळ्यात पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत विविध ठिकाणी बसवलेले पंप यावर देखरेख


-व्हिडीओ वॉल डीएलपी प्रोजेक्टर टेक्नॉलॉजीवर आधारीत असल्याने वॉल वरील उपलब्ध आठही पॅनल जीर्ण


-सद्यस्थितीतील व्हिडीओ वॉल ही गेल्या ९ वर्षांपासून अविरत नियंत्रण कक्षात वापरात


-वॉल बसवण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी आवश्यक

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने