Sanjay Kapoor Property Dispute : 'कपूर संपत्ती प्रकरण महाभारतालाही फिके पाडेल'

नवी दिल्ली : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद आता सर्वोच्च न्यायालयात अधिकच गाजू लागला आहे. संजय कपूर यांच्या आई राणी कपूर आणि तिसरी पत्नी प्रिया कपूर यांच्यात आर. के. फॅमिली ट्रस्टच्या नियंत्रणावरून संघर्ष सुरू असून, या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने “हे अत्यंत गुंतागुंतीचे कौटुंबिक प्रकरण महाभारतालाही फिके पाडेल,” अशी तीव्र टिप्पणी केली.



न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. राणी कपूर यांनी ट्रस्टच्या कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी दाखल केलेली नवी याचिका न्यायालयाने ऐकण्यास सहमती दर्शवली. “आम्ही या प्रकरणाची चौकशी करू,” असे स्पष्ट करत न्यायालयाने या वादाची गंभीर दखल घेतली.



राणी कपूर यांच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, सर्वोच्च न्यायालयाने ७ मे रोजी दिलेल्या आदेशाला बगल देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाने याआधी या वादात तोडगा काढण्यासाठी माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, त्यानंतर लगेचच रघुवंशी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कडून संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली, असा आरोप करण्यात आला.


१८ मे रोजी होणाऱ्या या बैठकीच्या अजेंड्यात दोन नवीन स्वतंत्र संचालकांची नियुक्ती आणि अधिकृत बँक स्वाक्षरीकर्त्यांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. हे सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थी प्रक्रियेच्या मूळ उद्देशालाच विरोध करणारे असल्याचा युक्तिवाद राणी कपूर यांच्या बाजूने करण्यात आला. दुसरीकडे, आरआयपीएलच्या वकिलांनी कंपनीने रिझर्व्ह बँकेच्या बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच पावले उचलल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, राणी कपूर यांनी हा प्रयत्न म्हणजे कंपनीच्या गुंतवणुकीवर आणि बँक खात्यांवर नियंत्रण मिळवण्याचा डाव असल्याचा आरोप केला.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि