Nashik : NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन समोर, एकाला अटक

Nashik connection of NEET paper exam : ३ मे रोजी देशभरात पार पडलेली बहुचर्चित 'नीट' (NEET UG) परीक्षा पेपरफुटीच्या गंभीर आरोपानंतर अखेर रद्द करण्याचा कठोर निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयामुळे देशभरातील तब्बल २२ लाख आणि महाराष्ट्रातील दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या खळबळजनक प्रकरणात आता नाशिक कनेक्शन समोर आले आहे.


NEET पेपर लीक प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून नाशिकमधून (Nashik) नीट परीक्षेचा पहिला पेपर फुटला असून येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर पहिली कॉपी नाशिकमध्ये समोर आली. नाशिकमधील ही लीक प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली, येथे फुटलेल्या पेपरचे 10 सेट तयार करण्यात आले. (Nashik connection)



त्यानंतर, हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीरपर्यंत नीटची प्रश्नपत्रिका सहजपणे पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एकाला ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून माहितीनुसार जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष हाच पेपरफुटीचा मास्टरमाईंड असल्याचे दिसून येते. मनिषने प्रश्नपत्रिका प्रिंट होण्यापूर्वीच पेपरमधील संभावित प्रश्न माहिती करुन घेतले होते.


या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी होती, याचा अंदाज यावरून येतो की, 'नीट'मधील एकूण १८० प्रश्नांपैकी तब्बल १५० प्रश्न या हस्तलिखित संचातून जसेच्या तसे विचारले गेले होते. याचा सरळ अर्थ असा की, ज्या विद्यार्थ्यांच्या हाती ही चिठ्ठी लागली, त्यांना ७२० पैकी सहज ६०० गुण मिळवणे सहज शक्य होते. या प्रचंड मोठ्या गैरव्यवहारामुळे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय टाळण्यासाठी, ३ मे रोजी झालेली NEET UG 2026 ची परीक्षा अखेर अधिकृतरीत्या रद्द घोषित करण्यात आली आहे.



आता, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल, त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र 3 मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही, मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी,पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर