Devendra Fadnavis : महाविकास आघाडीने बंद पाडलेली पोलीस गृहनिर्माण योजना पुन्हा सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय; ५,४५९ पोलिसांच्या घरांसाठी १,७६८ कोटींचा निधी मंजूर


मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये पोलीस गृहनिर्माण व्याजसवलत अनुदान योजना योजना सुरू केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात ही योजना बंद करण्यात आली. आता ही योजना पुन्हा सुरू करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ हजार ४५९ पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या घरांसाठी १ हजार ७६८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली.



गृह विभागाने मंगळवारी याबाबत शासन निर्णय जारी केला. त्यानुसार, पात्र पोलीस कर्मचाऱ्यांना बँकांमार्फत घरबांधणी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. या कर्जावरील व्याजाचा संपूर्ण भार राज्य सरकार उचलणार असून, त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रलंबित अर्जांपैकी ५ हजार ४५९ पात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या घराचा मार्ग मोकळा झाला आहे. यात एकूण १७६८.०८ कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा निश्चित करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत हा निधी वितरित केला जाईल. बँकांनी मंजूर केलेल्या कर्जाच्या प्रमाणात हा निधी टप्प्याटप्प्याने पोलिसांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.


मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर प्रहार

या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, "जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत आपल्या पोलिसांना घरे मिळाली पाहिजे, यासाठी प्रारंभीपासून मी आग्रही राहिलो आहे. त्यामुळेच २०१४ ते २०१९ या काळात मोठ्या संख्येने पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबविण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात ती योजना बंद केली गेली होती. नंतर पुन्हा आम्ही ती योजना सुरु केली. आज मला सांगताना आनंद होतो की, आमच्या ५ हजार ४५९ पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून १ हजार ७६८.०८ कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे".

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने