SRH VS GT : टॉप स्पॉटसाठी हैदराबाद विरुद्ध गुजरातमध्ये रंगणार थरारक सामना ! निकालाचा परिणाम आरसीबीवर ...

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये ५६ वा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स मध्ये खेळला जणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर प्लेऑफच्या शर्यतीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. दोन्ही संघ १४-१४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या- तिसऱ्या स्थानावर आहेत. या सामन्याच्या निकालाने आरसीबीचे पहिले स्थान जाण्याची शक्यता आहे.


दोन्ही संघांसाठी हा १२ वा सामना असणार आहे. हैदराबादने आतापर्यंत ११ सामन्यात ७ जिंकले आहेत आणि चार गमवला आहेत . १४ गुणांसह हैदराबाद गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातची परिस्थितही सारखी आहे . संघाने ११ सामन्यात आकरा जिंकले आहेत आणि चार गमवला आहेत. गुजरात १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांमध्ये फरक फक्त नेटन्रेटचा आहे. हैदराबादचा नेटरनरेट ०.७३७ आहे, तर गुजरातचा ०.२२८ आहे. यामुळे हा सामना दोघांसाठी महत्तवाचा ठरणार आहे.हैदराबादसाठी हेनरिक क्लासेनने सर्वधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यात ४९४ धवा केल्या आहेत, तर गोलंदाजीत ईशान मलिंगाने ११ सामन्यात सर्वाधिक १६ विकेट्स घेतल्या आहेत . गुजरातसाठी कर्णधार शुभमन गिलने फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने ११ सामन्यात ४६२ धावा केल्या आहेत. कागिसो रबाडाने गुजरातसाठी ११ सामन्यात सर्वाधिक १८ विकेट्स घेतल्या आहेत.


हेड टु हेड


आयपीएलमध्ये या दोन संघात आतपर्यंत सात सामने झाले आहेत. यात गुजरातने पाच सामने जिंकले आहेत, एक सामना पाऊसामुळे वाया गेला होता, तर हैदराबादला एक सामन्यात गुजरातला हरवण्यात यश आले आहे.



या निकालाचा परिणाम आरसीबीवर होईल.


आरसीबीने मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली होती. आरसीबी सध्या १४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आरसीबीचा रनरेट गुजरात आणि हैदराबाद पेक्षा चांगला आहे, मात्र या सामन्यात जो संघ जिंकेल त्याचे १६ गुण होतील , यामुळे आरसीबील आपले अव्वल स्थान गमवावे लागेल.


पिच रिपोर्ट
हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या सामन्यात मोठी धावसख्ंया होण्याची शक्यता आहे.



स्क्वॉड :


गुजरात टायटन्स : साई सुधारसन, शुबमन गिल (क), जोस बटलर (डब्ल्यू), वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, निशांत सिंधू, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, रविश्री कुमार, सुश्री कुमार, मनीषा कुमार, मनीषा कुशार कुलवंत खेजरोलिया, इशांत शर्मा, शाहरुख खान, जयंत यादव, ल्यूक वुड, गुरनूर ब्रार, अशोक शर्मा, कॉनर एस्टरहुइझेन


सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (डब्ल्यू), हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (क), शिवांग कुमार, एशान मलिंगा, साकिब हुसेन, अनिकेत वर्मा, प्रफुल हिंगे, लियाम लिव्हिंगस्टोन, हर्ष दुबे, हर्ष दुबे, हर्ष दुबे, उन्मूलन पटेल, उन्हेन पटेल. कामिंदू मेंडिस, गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, क्रेन्स फुलेत्रा, ओंकार तरमले, आरएस अंबरीश, अमित कुमार

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून