BMC News : फेरीवाल्यांच्या नगर पथ विक्रेता समितीवर नगरसेवक निमंत्रित सदस्य का?

विधी समितीच्या बैठकीत नगरसेवकांचा सवाल


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत फेरीवाल्यांचा समस्या निकालात काढण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या टाऊन वेंडींग समितीवर फेरीवाल्यांचे प्रतिनिधी नियुक्त झाल्यानंतर आता व्यापारी संघटनांचे तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी नियुक्त केले जात आहेत. परंतु या समितीवर नगरसेवकांना मात्र निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त केले जाणार असून या नगर पथविक्रेता समितीवर नगरसेवक निमंत्रित सदस्य कसे काय असा सवाल विधी समितीच्या बैठकी सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे नगरसेवकांना या समितीवर कायम घेण्यात यावे आणि नगरसेवकांना या समितीवर घेण्यासाठी विधी विभागाने यासंदर्भातील बाबींचा पुन्हा एकदा अभ्यास करावा आणि यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या समितीच्या सदस्यांची निवड करण्याची प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी अशाप्रकारचे निर्देश विधी समिती अध्यक्षांनी दिले आहेत.



मुंबई महापालिकेच्या विधी व महसूल समितीच्या बैठकीत भाजपचे सिध्दार्थ शर्मा (Siddharth Sharma) यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्य समितीवर नगरसेवकांना स्थान नसल्याची बाब समितीच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आता प्रशासनाच्यावतीने टाऊन वेंडींग समितीवर सदस्य निवडीकरता वृत्तपत्रात जाहिरात देवून व्यापारी संघटनांसह इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींची निवड करण्याचे काम सुरु आहे. परंतु यामध्ये नगरसेवक कुठेच नसून जर फेरीवाल्यांचे प्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी जर या समितीवर असतील तर नगरसेवकांना का स्थान नाही? त्यामुळे न्यायालयाने अशाप्रकारे काही निर्देश दिले आहेत का? न्यायालच्या निर्देशानुसार नगरसेवकांना स्थाना दिले जात नाही का याची माहिती समितीला होणे आवश्यक आहे. नगरसेवक हे महापालिकेचे विश्वस्त असून ते जर या समितीवर नसतील तर फेरीवाल्यांसंदर्भात ते काहीही निर्णय घेवू शकतात. त्यामुळे नगरसेवकांना या समितीवर सदस्य म्हणून नेमणूक करण्याबाबत काय धोरण आहे हे समोर यायला हवे असे मत सदस्यांनी मांडले. यावर विधी व महसूल समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी याबाबत विधी विभागाने पुन्हा अभ्यास करून नगरसेवकांना या समितीत का स्थान नाही याची माहिती द्यावी असे निर्देश दिले. यावेळी प्रशासनाच्यावतीने नगरसेवक निमंत्रित सदस्य असतील असे सांगण्यात आले, पण नगरसेवक हे विश्वस्त असून ते निमंत्रित का असा सवाल करत या समितीवर नगरसेवकांना स्थान मिळायला हवे. यासाठी याबाबतची प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने