Kharghar : खारघरमधील 'गोदरेज' आणि 'भगवती विहान' प्रकल्पांच्या नियमबाह्य कामांची सात दिवसांत चौकशी करा; महसूल मंत्री

मुंबई:पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर शहरात सुरू असलेल्या 'गोदरेज प्रॉपर्टीज' आणि 'भगवती विहान' या गृहप्रकल्पांमधील नियमबाह्य उत्खनन, बांधकामाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित यंत्रणांनी सात दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. "नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही," असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.खारघरमधील सेक्टर ५ आणि सेक्टर १० मधील या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य गौण खनिज उत्खनन, विनापरवाना ब्लास्टिंग आणि अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी आमदार विक्रांत पाटील यांनी महसूल मंत्र्यांकडे पत्राद्वारे केल्या होत्या. या पत्रात नमूद केल्यानुसार, सिडकोच्या खारघर नोडमधील गृहप्रकल्प शासकीय परवानगी न घेता नियमबाह्य पद्धतीने सुरू आहेत. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल मंत्र्यांनी आज तातडीने बैठक बोलावली होती.



पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. अवजड डम्पर्सच्या वाहतुकीमुळे सेक्टर ५ मध्ये एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अनधिकृत ब्लास्टिंग आणि धुळीमुळे खारघरमधील हवा बिघडत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे असेही आ. विक्रांत पाटील यावेळी म्हणाले. महसूल मंत्र्यांनी सिडको, महसूल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची संयुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.रायगडचे जिल्हाधिकारी, सिडको व पनवेल महानगरपालिका आयुक्त, आरटीओ अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी आणि खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने