Mumbai Crime News : भायखळ्यात गोळीबार, 'डी-कंपनी' कनेक्शनमुळे पोलीस यंत्रणा सतर्क; हल्लेखोर पसार

मुंबई : मुंबईतील गजबजलेल्या भायखळा (Byculla News) परिसरात काल एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर भररस्त्यात गोळीबार केला. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून, भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे.



डी-कंपनीचा हस्तक आसिफ दाढीचा मुलगा लक्ष्य?



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा गोळीबार दक्षिण मुंबईतील डोक्यार्ड रोड परिसरात झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव समीर शेख असून, तो कुख्यात 'डी-कंपनी'चा हस्तक मानल्या जाणाऱ्या आसिफ दाढीचा मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी समीरला लक्ष्य करत गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी समीरच्या मांडीला लागली असून, तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच हल्लेखोर वेगाने पसार झाले.
जखमी समीर शेखला तातडीने उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून भायखळा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंबई गुन्हे शाखेची (Crime Branch) पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. हा हल्ला जुन्या वादातून झाला की यामागे काही टोळीयुद्ध आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.



उल्हासनगरमध्ये सुद्धा असंच काहीसं घडलं...


उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ५ परिसरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. भगवानदास हॉस्पिटलजवळून पायी जाणाऱ्या एका तरुणाला काही गुंडांनी अडवले. "तुला रोडवरून चालता येत नाही का?" असे म्हणत त्यांनी विनाकारण हुज्जत घातली. या किरकोळ शाब्दिक वादाचे रूपांतर अवघ्या काही सेकंदात भीषण हाणामारीत झाले. संबंधित आरोपींनी तरुणाला भररस्त्यात घेरले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही सर्व घटना जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यामध्ये आरोपींची मुजोरी स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेनंतर पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे होणाऱ्या मारहाणीमुळे उल्हासनगरमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने