Rohit Pawar : सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल २२ आमदारांसह भाजपच्या चिन्हावर लढणार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे तब्बल २२ आमदारांसह आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याचा खळबळजनक दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बुधवारी केला. तटकरे यांनी मंगळवारी रात्री शरद पवारांची घेतल्याचे निमित्त साधत रोहित पवारांनी हा दावा केला आणि नव्या वादाला फोडणी दिली. (Rohit Pawar's claim)


सुनील तटकरे यांनी 'सिल्व्हर ओक'वर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, "सुनील तटकरेंना कदाचित सिल्व्हर ओकचा चहा आवडत असेल, म्हणून ते तिथे गेले असावेत. पण माझ्या माहितीनुसार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे २२ आमदार घेऊन भाजपमधूनच निवडणूक लढवणार आहेत. केवळ राष्ट्रवादीच नव्हे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचेही काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) हे देखील भाजपच्या चिन्हावर लढणार हे नक्की झाले आहे", असा दावा त्यांनी केला. (Rohit Pawar's claim)



तटकरे आणि शेळकेंचे प्रत्युत्तर


रोहित पवारांच्या या दाव्यावर सुनील तटकरे (Sunil Tatkare)  यांनी अत्यंत त्रोटक शब्दांत प्रतिक्रिया दिली. "मी रोहित पवारांच्या मताला अजिबात किंमत देत नाही," असे म्हणत त्यांनी हा विषय संपवून टाकला. दुसरीकडे, आमदार सुनील शेळके (Sunil Shelke)  यांनी रोहित पवारांवर (Rohit Pawar) सडकून टीका केली. "रोहित पवार गेल्या काही महिन्यांपासून सवंग प्रसिद्धीसाठी सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. २०२९ मध्ये स्वतः रोहित पवार (Rohit Pawar) काँग्रेसकडून बारामतीत उभे राहण्याचा प्लॅन करत आहेत, हे आम्हाला माहिती आहे. पक्षात चलबिचल करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही," असे शेळके यांनी सांगितले.



शरद पवारांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण


सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावर (Social media) पोस्ट करत आपल्या भेटीचे स्पष्टीकरण दिले आहे. "पवार साहेबांची प्रकृती बरी नसल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली होती. सहा दशके त्यांनी देशाच्या राजकारणात योगदान दिले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केले आहे. या भेटीत कोणताही राजकीय हेतू नव्हता," असे तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य