Ashok Kharat : खरात प्रकरणातील तेरा हजार आक्षेपार्ह व्हिडिओ डिलीट; 451 सोशल मीडिया खाती कायमस्वरुपी बंद

Ashok Kharat : नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयटीच्या सायबर टीमने (Cyber Team) पीडितांच्या सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या तब्बल १३,१७५ आक्षेपार्ह व्हिडिओ लिंक्स इंटरनेटवरून हटवल्या आहेत. त्यासोबतच वारंवार अशा पोस्ट टाकणारी ४५१ सोशल मीडिया खाती कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहेत.


स्वयंघोषित कॅप्टन, तसेच स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांचे लैंगिक शोषण करणारा तसेच भक्तांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणात एसआयटीने धक्कादायक माहिती दिली आहे. अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण समोर आल्यानंतर खरात आणि पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले होते, त्यानंतर सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून हे आक्षेपार्ह व्हिडीओ वेगाने व्हायरल होत होते. ज्यामुळे पीडित महिलांची बदनामी होत होती.


याच पार्श्वभूमीवर सायबर टीमने सोशल मीडियावर करडी नजर ठेवली होती. दरम्यान पीडितांच्या सोशल मीडियावर (Social media) प्रसारित करण्यात आलेल्या तब्बल १३,१७५ आक्षेपार्ह व्हिडिओ लिंक्स एसआयटीच्या सायबर टीमने इंटरनेटवरून हटवल्या आहेत. तसेच वारंवार अशा पोस्ट टाकणारे ४५१ सोशल मीडिया अकाऊंट कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहेत.



एसआयटीच्या तपासात खरातच्या गुन्ह्यांची कार्यपद्धती समोर आली आहे. संशयित खरात हा पीडित व्यक्तींच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना मृत्यूची भीती दाखवत होता. खडे, चिंचुके, रूद्राक्ष आणि बनावट पूजाविधींच्या लोकांकडून पैसे उकळत होता. तर, ईशानेश्वर माध्यमातून तो मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेऊन तो बनावट नाग दाखवून हातचलाखीने चमत्कार करत असल्याचे भासवत होता. महिलांना दैवी शक्तीची भीती दाखवून आणि बदनामीची धमकी देऊन त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये ६० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे अनिवार्य असल्याने, एसआयटीने आतापर्यंय दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर दर केले आहे. उर्वरित गुन्ह्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. खरात हा तब्बल ४९ दिवस एसआयटीच्या कोठडीत होता आणि सध्या तो सिन्नर पोलिसांच्या अटकेत आहे. या कारवाईसाठी २४ पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक अहोरात्र काम करत असून, खरातच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी काही पीडितांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



अशोक खरातवर नाशिक आणि नगर जिल्ह्यात एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी महिला अत्याचाराचे आठ आणि फसवणुकीच्या एका गुन्ह्याचा तपास एसआयटी करत आहे. उर्वरित गुन्हे स्थानिक पोलीस तपासत आहेत. एसआयटीकडे एकूण ११ गुन्हे तपासासाठी असून १०५ हून अधिक लोकांची चौकशी व साक्ष नोंदविली आहे. मौखिक, भौतिक, दस्तऐवजी आणि इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील भक्कम पुरावे जप्त केले जात आहेत.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :