Central Railway : विद्याविहार स्थानकावरील मधल्या पादचारी पुलासाठी विशेष ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेकडून विद्याविहार रेल्वे स्थानक येथे मधल्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी १५ ते १८ मे दरम्यान विविध रात्री विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा ब्लॉक कुर्ला ते भांडुप दरम्यान राहणार असून, काही उपनगरी लोकल गाड्यांचे मार्गांतर, शॉर्ट टर्मिनेशन तसेच काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. १५ व १६ मे, १६ व १७ मे आणि १७ व १८ मे च्या मध्यरात्री विविध वेळांमध्ये ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत पादचारी पुलाच्या गर्डरचे काम सुरक्षितपणे पूर्ण करण्यात येणार आहे.


ब्लॉकचे वेळापत्रक :


१५ व १६ मे : रात्री १.१५ ते पहाटे ४.१५


१६ व १७ मे : रात्री १२.१० ते पहाटे ४.४०


१७ व १८ मे : रात्री १.१५ ते पहाटे ३.०५


कुर्ला (स्थानक वगळून) ते भांडुप (क्रॉसओव्हर वगळून) दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर, तसेच काही दिवशी जलद मार्ग, पाचवा आणि सहावा मार्ग यावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.१६ व १७ मेच्या रात्री काही कर्जत, कसारा, बदलापूर आणि अंबरनाथ लोकलचे मार्गांतर करण्यात येणार असून त्या विद्याविहार,कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत. याशिवाय काही उपनगरी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे-कुर्ला, ठाणे-सीएसएमटी तसेच सीएसएमटी-ठाणे या काही उशिराच्या लोकल फेऱ्या चालणार नाहीत. काही वातानुकूलित लोकल आणि उपनगरी गाड्या कुर्ला किंवा ठाणे स्थानकांपर्यंतच धावतील. तसेच काही पहाटेच्या फेऱ्या बदललेल्या स्थानकांवरून सुरू करण्यात येतील. मात्र,१५ व १६ मे आणि १७ व १८ मे रोजी धावणाऱ्या नियमित लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरही विशेष परिणाम होणार नाही.

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत