Maharashtra's Colleges : महाविद्यालयांमधील 'छुप्या' शुल्क वसुलीला चाप

प्रवेश शुल्काबाबत सर्व माहिती दर्शनी फलकावर लावणे बंधनकारक; लपवाछपवी केल्यास कारवाई


मुंबई : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असतानाच, राज्य सरकारने महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराला आणि अवाजवी शुल्क वसुलीला चाप लावला आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील सर्व महाविद्यालयांनी ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर सर्व प्रकारच्या शुल्काची अद्ययावत माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर आणि प्रवेश माहितीपुस्तिकेत स्पष्टपणे नमूद करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.



प्रवेश शुल्काबाबत विद्यार्थ्यांची किंवा पालकांची कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी सर्व विभागीय सहसंचालक आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेलेच शुल्क महाविद्यालयांना आकारता येणार आहे. प्रवेश घेण्यापूर्वीच इच्छुक विद्यार्थ्यांना या शुल्काची संपूर्ण माहिती देणे ही संबंधित महाविद्यालयांची कायदेशीर जबाबदारी असेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.


अनेकदा प्रवेश निश्चित झाल्यानंतर किंवा छुप्या शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक अडवणूक केली जाते. या पार्श्वभूमीवर, "प्रवेश शुल्काबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची सर्वस्वी दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालय प्रशासनाला थेट जबाबदार धरून कारवाई केली जाईल," असा इशारा उच्च शिक्षण संचालनालयाने दिला आहे.




सहसंचालक आणि कुलसचिवांवर जबाबदारी

महाविद्यालयांनी आपल्या सूचना फलकावर आणि माहितीपुस्तकेत शुल्काचा तपशील प्रसिद्ध केला आहे की नाही, हे तपासण्याची आणि त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठांचे कुलसचिव आणि विभागीय सहसंचालक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सर्व संलग्नित महाविद्यालयांना याबाबतचे आदेश तात्काळ लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने