Dr. Anand Nadkarni Passes Away : ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी काळाच्या पडद्याआड

मुंबई : मानवी मनाचे गुंतागुंतीचे पेच, मानसिक आजार सर्वसामान्यांना सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगणारे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी (१५ मे) रोजी पहाटे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. मार्च महिन्यात त्यांना पॅन्क्रियाटिक न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचे निदान झाले होते. ६ मे रोजी मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, १३ मेच्या रात्री त्यांना उलट्यांचा त्रास झाला आणि त्यानंतर अॅस्पिरेशन न्यूमोनिया झाला. त्याच रात्री आतड्याला पडलेल्या छिद्रामुळे त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. सुरुवातीला प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती, मात्र नंतर त्यांचा रक्तदाब अचानक घसरला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अखेर शुक्रवारी पहाटे ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.



मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी डॉ. नाडकर्णी यांनी आयुष्यभर कार्य केले. मानसिक आजार हा शारीरिक आजारांइतकाच सामान्य विषय आहे, हे त्यांनी आपल्या लेखन, व्याख्यानं आणि समुपदेशनातून प्रभावीपणे समाजासमोर मांडलं. त्यामुळेच त्यांना ‘शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट’ म्हणून ओळखलं जात होतं.


डॉ. नाडकर्णी हे केवळ मानसोपचारतज्ज्ञ नव्हते, तर ते एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी मानसशास्त्रासोबतच साहित्य, नाटक आणि सामाजिक विषयांवरही विपुल लेखन केलं. त्यांच्या ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’ यांसारखी व्यावसायिक नाटकं त्यांनी लिहिली, तर ‘मयसभा’ या नाटकाला लेखन पुरस्काराने गौरवण्यात आले होते.


मनोविकारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने त्यांनी २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ (IPH) या संस्थेची स्थापना केली. मानसिक आरोग्य, समुपदेशन, कुटुंबव्यवस्था आणि स्व-विकास या क्षेत्रांत संस्थेमार्फत त्यांनी मोठं काम उभं केलं. साहित्य, संगीत, नाट्य, चित्रकला आणि संवाद यांच्या माध्यमातून मानसिक आरोग्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला.

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.