Mumbai Water Cut : मुंबईकरांनो तयारीत रहा! १८ मे रोजी १२ तास पाणीपुरवठा बंद, ‘या’ भागांना फटका

मुंबई : मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा १२ तासांसाठी बंद राहणार असून अनेक परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यासोबतच नागरिकांनी पुढील सात दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे महत्त्वाचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.



बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत अमर महाल (हेडगेवार उद्यान) ते तुर्भे निम्नस्तरीय जलाशय या दरम्यान जलबोगदा कार्यान्वित करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे सोमवार, १८ मे २०२६ रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत तब्बल १२ तास ‘एम पूर्व’ आणि ‘एम पश्चिम’ विभागातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असून काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी येणार आहे.


याशिवाय ‘एम पूर्व’ विभागातील प्रभाग क्रमांक १४६, १४७ आणि १४८ तसेच ‘एम पश्चिम’ विभागातील प्रभाग क्रमांक १५४ आणि १५५ मधील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवार, १८ मे २०२६ पासून सोमवार, २५ मे २०२६ पर्यंत पुढील सात दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे निर्देश महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत.



दरम्यान, संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे तसेच या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


पाणीपुरवठा विस्कळीत व कमी दाबाने राहणारे परिसर पुढीलप्रमाणे –


एम पूर्व विभागातील परिसर :


एच. पी. सी. एल. रिफायनरी, एच. पी. सी. एल. वसाहत, वरूण बेवरेजेस, बी. ए. आर. सी., गव्हाणपाडा, इंडियन ऑईल कंपनी लिमिटेड, बी. पी. सी. एल. वसाहत, टाटा वसाहत, नित्यानंद बाग, राणे चाळ, आर. सी. एफ. वसाहत.


भारत नगर, जे प्लॉट, हशू अडवाणी नगर, आणिक गाव, एम. ई. सी. बी. वसाहत, सह्याद्रीनगर, आर. एन. ए. उद्यान, म्हाडा इमारती, रॉकलाइन इमारती, विष्णू नगर, व्हिडिओकॉन इमारती, एस. जी. केमिकल इमारती, प्रयागनगर.


ओम गणेश नगर, राहुल नगर आणि अशोक नगर या भागांमध्येही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.


एम पश्चिम विभागातील परिसर :


एम. एस. इमारती १ ते ३२, बी. पी. टी., इंडियन ऑईल, ब्लेडिंग लिमिटेड, टाटा पॉवर लिमिटेड, एजीस केमिकल लिमिटेड, भारत पेट्रोलिअम लिमिटेड, आर. सी. एफ. लिमिटेड, चेंबूर कॅम्प, सिंधी कॅम्प, विजय विहार, सुमन नगर, भक्ती भवन, चिखल वाडी, समर्थ नगर, बसंत पार्क, सी. जी. गिडवाणी मार्ग, गांधी बाजार, जनता बाजार, इंदिरा नगर, नवजीवन सोसायटी, गोल्फ क्लब, रामटेकडी, तोलाराम टॉवर, चेंबूर वसाहत, कोकण नगर, गणेश नगर, विजय नगर, अशोक नगर, अण्णा भाऊ साठे मार्ग, सिंधी सोसायटी, जिल्हाधिकारी वसाहत, मरवली चर्च आणि आर. सी. मार्ग.


तसेच माहूल गाव, आंबापाडा गाव, म्हैसूर वसाहत, वाशी गाव, डी. बी. रिअँलिटी इमारत, वाडवली, शरद नगर, लक्ष्मी नगर, जनता नगर, वाशी नाका आणि जिजामाता नगर या भागांमध्येही पाणीपुरवठा प्रभावित राहणार आहे.


पी. एल. लोखंडे मार्ग, एकता मित्र मंडळ, मालेकर वाडी, पी. वाय. थोरात मार्ग, रमाबाई वसाहत, अमीर बाग, जनता नगर, मोतिलाल रहिवाशी संघ, कादरिया नगर, महात्मा फुले नगर, अजंठा वसाहत, सहदीप वसाहत, मुकुंद नगर, पंजाबी चाळ, नागेवाडी आणि छेडा नगर या परिसरांनाही या पाणी कपातीचा फटका बसणार आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने