युवकांचा अवमान सहन करणार नाही, संजय राऊत माफी मागा

युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचा इशारा


देशातील युवक सुसंस्कृत, राऊतच मंद झालेत


ठाणे : देशातील युवकांचा अवमान करणाऱ्या उबाठा खासदार संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवा सेनेकडून शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी आज दिला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


सरनाईक म्हणाले की, राऊत यांना चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारे वाईट बोलण्याची सवय आहे. राऊतच मंद झाले असून भरकटले आहेत, अशी टीका सरनाईक यांनी केली. राऊत यांनी तरुणांबद्दल केलेल्या एक्स पोस्टची सरनाईक यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते पुढे म्हणाले की राऊतांनी त्यांच्याच पक्षातील युवा नेत्यावरचा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि देशातील युवकांवर खापर फोडले असावे, असा टोला सरनाईक यांनी यावेळी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील युवा पुढे जात आहे. देश विकास पथावर आहे, मात्र विकासावर टीका करणे हा राऊत यांना रोग लागला आहे. राऊत यांनी युवकांचा केलेला अवमान खपवून घेणार नाही. त्यांनी कॅमेऱ्यासमोर माफी मागितलीच पाहिजे, अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवा सेना शिवसेना स्टाईल आंदोलन करेल, असा इशारा सरनाईक यांनी यावेळी दिला.



शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील तरुण पुढे जात आहेत आणि येणाऱ्या काळात राज्यासाठी चांगले काम करतील, असा विश्वास सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला. देशात युवकांना उज्ज्वल भविष्य आहे. राऊतांकडून युवकांना भरकटवण्याचे काम होत आहे मात्र त्याला इथला युवक बळी पडणार नाही, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. देशातील आणि महाराष्ट्रातील युवा सुसंस्कृत असून नेपाळसारखे भारतात युवकांकडून आंदोलन होणार नाही, असे सरनाईक म्हणाले.

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव