Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या मोहिमेला मोठे यश आले आहे. पोलिसांनी जिल्ह्यात सक्रिय असलेल्या सर्व ८ नक्षलवाद्यांना अटक केली असून, ३८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या आणखी ५ नक्षलवाद्यांनी शनिवारी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्हा आता पूर्णत: नक्षलमुक्त झाला आहे.



अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये कंपनी क्रमांक १० चा विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला, जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामो, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोडियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर शासनाने एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांनी या आरोपींकडून एके-४७, एसएलआर आणि अन्य बंदुकांसह ६५ लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.



७ फेब्रुवारी २०२६ रोजी भामरागड जवळील फोदेवाडा जंगलात झालेल्या चकमकीत एक पोलीस जवान शहीद झाला होता. या हत्येमध्ये अटकेतील काही नक्षलवाद्यांचा सहभाग होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी यातील ४ जणांना तेलंगणातून, दोघांना कुमनार येथून आणि दोघांना नैताळा येथून अटक केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिली.



दुसरीकडे, पोलिसांसमोर शरणागती पत्करलेल्या ५ नक्षलवाद्यांमध्ये एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. मधु उर्फ राकेश वेळदा, जीवन उर्फ जग्गू मडकाम, रजनी उर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुनेम अशी आत्मसमर्पण केलेल्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांविरुद्धचा सशस्त्र संघर्ष संपला असल्याचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले. मात्र, नक्षलवादी विचारधारा लगेच संपत नसल्यामुळे, इतर राज्यांतून नक्षलींनी जिल्ह्यात पुन्हा प्रवेश करू नये यासाठी पोलीस यापुढेही सातत्याने लक्ष ठेवून राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी