मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात


मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरात अनधिकृतरित्या उभारलेल्या तात्पुरत्या संरचना आणि बांधकाम, टर्फ यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'टी' विभाग कार्यालयाने शनिवारी १६ मे २०२६ पासून निष्कासनाची कारवाई सुरू केली आहे.यात इमारत क्रमांक २ (तथास्तु सभागृह) जवळ असलेले अनधिकृत तात्पुरते शेड आणि शेजारील टर्फ तोडण्यात आले. तसेच इमारत क्रमांक २ च्या बाहेरील बाजूस असलेले २ अतिरिक्त शेडही हटवण्यात आले.मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे शुक्रवारी १५ मे २०२६ रोजी बैठक झाली. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल तसेच कालिदास नाट्यगृह कामकाजाच्या अनुषंगाने पुनर्रचना आणि सुधार करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर परिसरात पाहणी करण्यात आली.


या बैठकीस आणि पाहणी दौऱ्यात महापौरांसोबत आमदार मिहिर कोटेचा, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी खासदार मनोज कोटक, प्रभाग समिती अध्यक्ष साक्षी दळवी, नगरसेविका दीपिका घाग, नगरसेविका हेतल गाला - मोरवेकर, नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्यासह उपआयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.या पाहणी दरम्यान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरात काही अनियमितता, तात्पुरत्या संरचना आणि अनधिकृत बांधकामे आढळून आली. त्या संरचना तसेच अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. त्यानुसार शनिवार पासून कारवाई सुरू करण्यात आली आहे.


'टी' विभाग कार्यालयाने शनिवारी सकाळीच क्रीडा संकुलात कारवाई सुरू केली. यात इमारत क्रमांक २ (तथास्तु सभागृह) जवळ असलेले अनधिकृत तात्पुरते शेड आणि शेजारील टर्फ तोडण्यात आले. तसेच इमारत क्रमांक २ च्या बाहेरील बाजूस असलेले २ अतिरिक्त शेड देखील हटवण्यात आले.बॅडमिंटन कोर्ट व सांस्कृतिक सभागृह (इमारत क्रमांक ४) च्या बाहेरील बाजूस फायबर शीट लावून केलेले अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले, तसेच इमारतीच्या आत लावलेले अनधिकृत फ्लेक्स काढून टाकण्यात आले. टेनिस कोर्टच्या प्रेक्षक गॅलरीवर उभारलेले तात्पुरते शेडही पूर्णपणे हटवण्यात आली.


ही कारवाई करण्यासाठी २५ कामगार तैनात करण्यात आले होते. तसेच अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी १ जेसीबी, २ गॅस कटर आणि २ ग्राइंडर या संयंत्रांचा वापर करण्यात आला.महापौरांच्या निर्देशानंतर अवघ्या २४ तासांच्या आत महानगरपालिकेने ही धडक कारवाई केली यामुळे क्रीडाप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे. यापुढेही ही तोडक कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर