IPL 2026 : ऐतिहासिक आयपीएल २०२६, सर्व १० संघांनी एकत्र येऊन केला अनोखा विक्रम

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्प्यात आहे. २०२६ च्या प्लेऑफची सुरुवात २६ मे पासून होणार आहे, तर हंगामातला अखेरचा साखळी सामना २४ मे रोजी होणार आहे. टॉप पाच संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलच्या १९ व्या हंगामात नवीन विक्रम रचला गेला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व १० संघांनी एकत्र येऊन अनोखा विक्रम केला आहे. प्रत्येक संघातील किमान एका क्रिकेटपटूने यंदाच्या आयपीएलमध्ये शतक झळकावले आहे.


आयपीएल २०२६ च्या ५७ व्या सामन्यात विराटने कोलकाता विरुद्ध शानदार शतक केले आणि आयपीएलच्या इतिहासात कधी न झालेला विक्रम नोंदवला गेला. आयपीएल २०२६ मध्ये शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये वैभव सूर्वंशी सारख्या युवा फलंदाजाचा समावेश आहे. तसेच विराट कोहली आणि क्विंटन डी कॉक सारख्या दिग्गजांचा समावेश आहे.



यंदाच्या हंगामात शतकी खेळी करणारे खेळाडू-


१. संजू सॅमसन (चेन्नई सुपर किंग्स) : संजू सॅमसनने यंदाच्या हंगामात सीएसकेकडून खेळत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने चेपॉकवर दिल्ली विरुद्ध नाबाद ११५ धावा आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद १०१ धावा केल्या आहेत. त्याने यंदाच्या हंगामात दोन शतके केली आहेत.


२.क्विंटन डी कॉक, रायन रिचकलटन आणि तिलक वर्मा (मुंबई इंडियन्स) : मुंबई २०२६ च्या प्लेऑफमधूम बाहेर झाली असली तरी त्यांच्या तीन फलंदाजांनी शतक झळकवले आहे. पंजाब किंग्जविरुद्ध आपला पहिला सामना खेळताना डी कॉकने ६० चेंडूंत नाबाद ११२ धावा, तिलक वर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध ४५ चेंडूंत १०१ धावा आणि विकेटकीपर-सलामीवीर रिकल्टनने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध एमआयसाठी सर्वात जलद शतक केले. त्याने हे शतक ४४ चेंडूंत पूर्ण केले, एसआरएचविरुद्ध त्याने १२३ (५५) धावा केल्या.


३. केएल राहुल (दिल्ली कॅपिटल्स) :  दिल्लीने या हंगामात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही, मात्र केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. राहुलने पंजाब किंग्जविरुद्ध ६६ चेंडूंत नाबाद १५२ धावा केल्या. ही खेळी या हंगामातील सर्वोच्च आणि आयपीएलच्या इतिहासातील एका भारतीय खेळाडूने केलेली वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.


४. वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स): वैभवने यंदाच्या हंगामात सर्वात जलद शतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. त्याने हैदराबादच्या विरुद्ध अवघ्या ३७ चेंडूत १२ षटकारांच्या जोरावर १०३ धावा केल्या.


५. साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) : साई सुदर्शनने या हंगामात गुजरातसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आरसीबीविरुद्ध ५७ चेंडूत शतकी खेळी केली आहे.


६. अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैद्राबाद) : हैदराबादच्या या डावखुऱ्या फलंदाजाने दिल्लीविरुद्ध ६८ चेंडूत १३५ धावांची खेळी केली होती.


७. कूपर कॉनोली (पंजाब किंग्ज) : कूपर कॉनोलीने आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात हैदराबादविरुद्ध ५९ चेंडूत १०७ धावांची खेळी केली होती.


८. फिन ऍलन (कोलकाता नाईट रायडर्स) : न्यूझीलंडच्या या फलंदाजाने दिल्लीविरुद्ध ४७ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या.


९. मिचेल मार्श (लखनऊ सुपर जायंट्स) : मार्शने लखनऊसाठी आयपीएल इतिहासातील सर्वात जलद शतक केले आहे. त्याने आरसीबीविरुद्ध ४९ चेंडूत १०० धावा केल्या.


१०. विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) : कोहालीने केकेआरविरुद्धात लक्ष्याचा पाठलाग करताना ६० चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या.

Comments
Add Comment

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला