Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे सावट जुगारून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) नियोजित वेळेच्या ४ दिवस आधीच अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाले आहेत, अशी अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मक असल्यामुळे मान्सूनचा प्रवास प्रचंड वेगाने सुरू झाला आहे.



दरवर्षी साधारण २० मेच्या आसपास अंदमानात पोहोचणारा मान्सून यंदा १६ मे रोजीच दाखल झाला आहे. मान्सूनने निकोबार बेटे पूर्णपणे व्यापली असून अंदमान बेटांचा काही भाग, अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि अरबी समुद्राच्या आग्नेय भागात प्रगती केली आहे.

अंदमानातील वेळेआधीच्या आगमनामुळे यंदा केरळ आणि महाराष्ट्रातही मान्सून वेळेपूर्वीच धडकण्याची शक्यता आहे. सामान्यतः १ जून रोजी पोहोचणारा मान्सून यंदा २६ मेच्या आसपास केरळ किनारपट्टीवर धडकू शकतो. ५ जूनपर्यंत मान्सून गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. तर ६ जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचेल. ७ जूनपर्यंत पुण्यात मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज आहे. तसेच राज्याच्या इतर भागांत नियोजित वेळेच्या ३ ते ४ दिवस आधी म्हणजेच २ ते ५ जून दरम्यान मान्सून दाखल होऊ शकतो.



प्रवासाचा वेग जास्त : हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या अंदमान परिसरात ताशी ३५ ते ४५ किलोमीटर वेगाने पश्चिमेकडील वारे सक्रिय झाले आहेत. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक वातावरण आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनचा वेग वाढला आहे. विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार आहे. यामुळे यंदा भरपूर पाऊस पडेल, अशी आशा पल्लवीत झाली आहे.

मध्य भारतात उष्णतेची लाट : महाराष्ट्रात पावसाची शक्यता: मान्सून पुढे सरकत असतानाच, महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजेच १७ मेपासून दक्षिण कडील जिल्हे, मराठवाड्याचा काही भाग आणि किनारी प्रदेशात सोसाट्याचा वारा, विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ईशान्य भारतात मुसळधार : पुढील ४ ते ५ दिवस ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचा प्रवास सुरू झाला असला, तरी उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतासह महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांत पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट आणि उकाडा कायम राहील.
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर