Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास पूर्ण करत अवघ्या १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. तब्बल ११०० पानांचं हे आरोपपत्र असून त्यामध्ये ५० हून अधिक साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे, फोटो, व्हिडीओ आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आणखी तीव्र झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रामध्ये आरोपी भीमराव कांबळे विरोधातील अनेक महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी सादर केले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाशी संबंधित ५० हून अधिक फोटो आणि काही महत्त्वाचे व्हिडीओ पुराव्यांमध्ये समाविष्ट केले आहेत. याशिवाय तांत्रिक पुरावे, डीएनए आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल देखील आरोपपत्रासोबत जोडण्यात आले आहेत. या प्रकरणात ५० पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून प्रत्येक बाबीची बारकाईने नोंद करण्यात आली आहे.



या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आता हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. पुढील आठवडाभरात सुनावणीला सुरुवात होणार असून रोजच्या रोज जलदगतीने सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा होत असताना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात ही अत्यंत संतापजनक घटना घडली होती. साडेतीन वर्षांची चिमुरडी सुट्टीसाठी आपल्या आजीकडे आली होती. त्याचवेळी ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याने तिला घराजवळील गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने चिमुरडीची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाखाली लपवून ठेवला होता.



चिमुरडी अचानक बेपत्ता झाल्यानंतर गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी काही जणांनी चिमुरडीला आरोपी भीमराव कांबळेसोबत जाताना पाहिल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतलं आणि चौकशीत हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली होती.


या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. आता पोलिसांनी जलद गतीने आरोपपत्र दाखल केल्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा अधिक बळावली आहे.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि