Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही आणि संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यातच दुखापतीमुळे हार्दिक मागील दोन सामन्यांत खेळला नाही. आता हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे.


दुसऱ्या लग्नाची चर्चा का सुरू झाली?


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही पोस्टनुसार, हार्दिक पांड्या २२ मे रोजी उदयपूरमध्ये मॉडेल आणि इन्फ्लुएंसर माहिका शर्मा हिच्यासोबत लग्न करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक आणि माहिका रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. माहिका अनेकदा भारताच्या तसेच मुंबई इंडियन्सच्या सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये दिसली आहे. यावरून चर्चा होत असतानाच हार्दिकने माहिकीशी लग्नाची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे.



लग्नाच्या बातम्यांमध्ये किती सत्य आहे ?


अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हार्दिक पांड्या किंवा माहिका शर्मा यांच्याकडून लग्नाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये अजून दोन सामने खेळायचे आहेत. त्यातील एक सामना केकेआरविरुद्ध २० मे रोजी ईडन गार्डन्स येथे होणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता मानली जात आहे.


नताशासोबतचं नातं तुटलं


हार्दिक पांड्याने ३१ मे २०२० रोजी अभिनेत्री आणि मॉडेल Natasa Stankovic हिच्यासोबत कोर्ट मॅरेज केले होते. नंतर २०२३ मध्ये उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने दोघांनी पुन्हा विवाह केला होता. या दोघांना आता अगस्त्य नावाचा मुलगा आहे. मात्र लग्नाच्या जवळपास चार वर्षांनंतर जुलै २०२४ मध्ये हार्दिक आणि नताशाने वेगळे होण्याचे ठरवले. अगस्त्य नताशा आणि हार्दिक दोघांसोबत आलटून पालाटून वास्तव्यास आहे. पण हार्दिक आणि माहिकाचं लग्न झालं तर अगस्त्य काय करणार ? हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.

Comments
Add Comment

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या