NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीत तज्ज्ञ म्हणून नेमणूक झालेल्या मनीषा मांढरे यांचा संबंध थेट प्रश्न तयार करणे आणि त्यांची विशिष्ट प्रकारे मांडणी करणे याच्याशी होता. या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत मनीषा मांढरेने प्रश्नपत्रिकेतील माहिती निवडक विद्यार्थ्यांना पुरवली आणि स्वतःचा मोठा आर्थिक फायदा करून घेतला. ही माहिती उघड होताच सीबीआय तसेच नीट परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक हादरले आहेत.



प्रामाणिकपणे परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. सीबीआयने दिल्लीच्या राउस अ‍ॅव्हेन्यू कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे ही वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे भाषांतर करण्याचे काम करत होती. मूळ प्रश्नपत्रिका तिच्या हाती होती. या प्रश्नपत्रिकेचा गैरवापर करत मनीषाने संपूर्ण परीक्षा यंत्रणेची विश्वासार्हताच धोक्यात आणली. विश्वासघात केला. मनीषा मांढरे ही पेपरफुटी प्रकरणातील एक महत्त्वाचा दुवा असल्याचे सीबीआयने सांगितले. मनीषा मांढरे आणि पीव्ही कुलकर्णी यांनी संगनमताने प्रश्नपत्रिका पुढे पोहोचविण्याचे काम केल्याचेही सीबीआयने सांगितले.



शुभम हे एक प्यादं आहे.मनीषा मांढरेने पीव्ही कुलकर्णीला हाताशी धरून आणि शुभम तसेच त्याच्या ओळखीतल्यांची मदत घेऊन प्रश्नपत्रिका फोडली, असा गंभीर सीबीआयने केला आहे.




विद्यार्थ्यांच्या पालकमांनी मोजले लाखो रुपये

नीट परीक्षेला बसलेल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी लाखो रुपये मोजून प्रश्नांची माहिती खरेदी केली. ही माहिती मुलांना पुरवली. प्रश्नांची माहिती अनेकांना पैसे घेऊन व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामद्वारे पुरवली गेली. तर काही जणांना सराव प्रश्नपत्रिका घेण्याच्या निमित्ताने प्रश्नांची माहिती देण्यात आली. या प्रकरणात सीबीआय अधिक माहिती जाणून घेण्यासाठी निवडक विद्यार्थी आणि काही पालक यांची सखोल चौकशी करत आहे. या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्यता आहे.




आतापर्यंत नऊ जणांना अटक




  1. नीट यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना सीबीआयने अटक केली आहे. आणखी काही जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील पाच, राजस्थानमधील तीन आणि हरियाणातील एकाचा समावेश आहे.

  2. निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी, पुणे, महाराष्ट्र : मूळचे लातूरचे. कोचिंग क्लासमधून सराव परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रश्न सांगितल्याचा आरोप

  3. प्राध्यापिका मनीषा मांढरे, पुणे, महाराष्ट्र : कोचिंग क्लासमधून सराव परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रश्न सांगितल्याचा आरोप

  4. मनीषा वाघमारे, पुणे, महाराष्ट्र : व्यवसायाने ब्युटीशियन. विद्यार्थी आणि पेपर फोडणारे शिक्षक यांच्यातील मध्यस्तीचे काम केल्याचा आरोप

  5. शुभम खैरनार, नाशिक, महाराष्ट्र : परीक्षेचे प्रश्न सार्वजनिक केल्याचा आरोप

  6. धनंजय लोखंडे, अहिल्यानगर, महाराष्ट्र : शुभमचा मित्र, परीक्षेचे प्रश्न सार्वजनिक केल्याचा आरोप

  7. मांगीलाल बिवल, जयपूर, राजस्थान : पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आरोपी

  8. विकास बिवल, जयपूर, राजस्थान : पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आरोपी

  9. दिनेश बिवल, जयपूर, राजस्थान : पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आरोपी

  10. यश यादव, गुरुग्राम, हरियाणा : पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आरोपी


CBI ने चौकशीसाठी ताब्यात घेतलेले संशयित




  1. ओंकार शिंगोटे, पुणे, महाराष्ट्र : शुभमचा मित्र, परीक्षेचे प्रश्न सार्वजनिक केल्याचा आरोप

  2. राकेश मंदावरिया, राजस्थान : आरके कन्सल्टन्सी या MBBS कन्सल्टन्सी फर्मचा चालक


WhatsApp, Telegram : परीक्षेचे प्रश्न सार्वजनिक करण्यासाठी वापरलेली Apps

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने