PBKS vs RCB : बंगळुरू प्लेऑफमध्ये; सलग सहाव्या पराभवामुळे पंजाबचे आव्हान संपले; CSK - RR ला फायदा

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला. रविवारी धरमशाला येथे झालेल्या सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्जला २३ धावांनी पराभूत केले.या विजयासह बंगळुरूने १३ सामन्यांत ९ वा विजय मिळवत १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आणि प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे. दुसरीकडे पंजाब किंग्सचा सलग सहावा पराभव झाल्याने त्यांचे प्लेऑफचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.



आरसीबीच्या फलंदाजांची उत्तम कामगिरी


या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार खेळला नाही. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व जितेश शर्माने केले. मात्र या सामन्यात व्यंकटेश अय्यरला संधी देण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. जेकॉब बेथेलने (jacob bethell) तिसऱ्या षटकात बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल (devdutt padikkal) आणि विराट कोहलीने उत्तम भागीदारी केली. या हंगामात पहिल्यांदाच आरसीबीसाठी खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरने तर पंजाबच्या गोलंदाजाना धुऊन काढले. त्याने अवघ्या ४० चेंडूत ७३ धावांची स्फोटक खेळी केली. त्याला विराट कोहलीचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कोहलीने दमदार फॉर्म कायम ठेवत ३७ चेंडूत ५८ धावांची खेळी केली.



२२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग अपयशी


या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली होती. सामन्यात प्रथम फलंदाजी करत बंगळुरूने पंजाबसमोर २२३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला २० षटकांत ८ बाद १९९ धावाच करता आल्या. पंजाबकडून शशांक सिंहने २७ चेंडूत ५६ धावा करीत झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.



CSK आणि राजस्थानला मोठा फायदा


या पराभवानंतर पंजाब किंग्सचे १३ सामन्यांत ६ विजय, ६ पराभव आणि १ अनिर्णित अशा कामगिरीसह १३ गुण झाले आहेत. त्यांचा आता फक्त एक सामना बाकी आहे आणि जास्तीत जास्त १५ गुणांपर्यंत ते पोहोचू शकतात. दरम्यान, गुजरात टायटन्सचे १६ गुण आहेत, तर सनरायझर्स हैदराबादचे १४ गुण आहेत.पंजाबच्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांना मोठा फायदा झाला आहे. राजस्थानचे अजून ३ , तर चेन्नईचे २ सामने बाकी आहेत. हे सामने जिंकले तर दोन्ही संघ पंजाबला मागे टाकत प्लेऑफच्या शर्यतीत पुढे जाऊ शकतात.



पंजाबसमोर कठीण समीकरण


पंजाबला आता प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर शेवटचा सामना जिंकण्याबरोबरच चेन्नई, राजस्थान आणि हैदराबाद या तीन संघांपैकी किमान दोन संघांचे उर्वरित सामने पराभूत होणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत पंजाब किंग्ससाठी प्लेऑफचा मार्ग खूप कठीण झाला आहे, त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे