Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या विक्रमाची नोंद केली. या सामन्यात किंग विराट कोहलीने ५८ धावांची अर्धशतकी खेळी करत ५०० धावांचा आकडा पार केला. विराटने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर याला मागे टाकले. विराट कोहलीने ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, यामध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. मागील सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली होती. या सामन्यातील ५८ धावांच्या खेळीसह त्याने ५२४ धावा केल्या आहेत.



विराट कोहलीने २०११ साली पहिल्यांदा आयपीएलमध्ये ५०० धावा पूर्ण केल्या आणि ५५७ धावा केल्या. त्यानंतर २०१३ मध्ये ६३४, २०१५ मध्ये ५०५ धावा केल्या. पण २०१६ चा हंगाम अविस्मरणीय ठरला, त्याने ४ शतकांसह ऐतिहासिक ९७३ धावा केल्या. त्याने २०१८ मध्येही ५००+ धावांचा टप्पा गाठला आणि नंतर सलग २०२३ मध्ये ६३९ धावा आणि २०२४ मध्ये ७४१ धावा करत पुन्हा ५०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. नवव्यांदा कोहलीने आयपीएलध्ये ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.



विराट कोहलीने पंजाब किंग्स विरुद्धचे सर्व ३७ टी २० सामने फक्त आयपीएलमध्येच खेळले आहेत. त्यामुळे तो आयपीएल इतिहासात एकाच फ्रँचायझीविरुद्ध १२०० धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे आणि त्याने आपली बादशाहत आणखी मजबूत केली आहे. पंजाबविरुद्ध त्याचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर नाबाद ११३ धावा आहे. कोहलीनंतर या यादीत इतर फलंदाजांची नावे येतात, पण किंग कोहलीच्या सातत्यापुढे सगळेच मागे पडले.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून