दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळवारी, राज्य सरकारने यासंदर्भातील निर्णय जारी केला आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी दगडूशेठ गणपती मंदिराचा 'क' वर्ग पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला होता. मात्र, पुण्यातील ऎतिहासिक स्थळांच्या जवळ असणारे हे मंदिर धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन साखळीतील महत्त्वाचा भाग असून 'अ' वर्ग स्थळांच्या निकषात बसते. त्यामुळे मंदिराचा अ वर्ग पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


राज्याच्या पर्यटन विभागाने मंगळवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय जारी केला आहे. सन १८९३ साली स्थापित झालेले हे मंदिर पुण्याच्या इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि समाजसेवेचे प्रतीक आहे. धार्मिक भक्ती, सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन विकास यांचा संगम या स्थळामध्ये आहे. पुणे शहरातील प्रसिद्ध आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असे हे स्थान महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि पर्यटन परंपरेचे प्रतीक बनल्याचे पर्यटन विभागाने आपल्या निर्णयात नमूद केले आहे. हे मंदिर पुण्यातील प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक असून देश-विदेशातील पर्यटक पुणे भेटीदरम्यान येथे दर्शनासाठी येतात. मंदिराचे भव्य स्थापत्य, सुवर्णमंडित मूर्ती, आकर्षक प्रकाशयोजना आणि उत्सवकाळातील सजावट पर्यटकांना विशेष आकर्षित करते.या स्थळाचेही पर्यटन विषयक महत्त्व लक्षात घेऊन यापूर्वी २०२३ मध्ये 'क' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. दरम्यानच्या काळात राज्यातील पर्यटन स्थळांची निवड व त्यांना 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याबाबतचे निकष ठरविण्यात आले. या निकषांची पूर्तता होत असल्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे या स्थळास अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन