FIFA World Cup 2026: ब्राझील व क्रोएशियाचे वर्ल्ड कप संघ जाहीर, नेमारची एन्ट्री

ब्राझीलिया : फिफा वर्ल्डकप २०२६ साठी (FIFA World Cup 2026) ब्राझील (Brazil national football team) आणि क्रोएशियाने (Croatia national football team) त्यांचे संघ जाहीर केले आहेत. याआधी फ्रान्स (France national football team) आणि बेल्जियमनेही (Belgium national football) त्यांचे वर्ल्डकपसाठीचे संघ जाहीर केले आहेत.पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील संघात स्टार फुटबॉलपटू नेमारची (Neymar) तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे, क्रोएशियाने अनुभवी मिडफिल्डर लुका मॉड्रीचला पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. ४० वर्षीय मोड्रिचच्या कारकिर्दीतील हा पाचवा वर्ल्ड कप असणार आहे. ब्राझीलच्या संघात Vinícius Júnior, Raphinha आणि युवा स्ट्रायकर Endrick यांचाही समावेश आहे. तसेच गोलरक्षक Alisson Becker दुखापतीतून सावरून संघात परतला आहे.


स्पर्धेला ११ जूनपासून सुरुवात


तब्बल ४८ संघांचा सहभाग असलेला विश्वचषक ११ जूनपासून सुरू होणार असून स्पर्धा अमेरिका (United States), कॅनडा (Canada) आणि मेक्सिको (Mexico) या तीन देशांतील १६ शहरांमध्ये होणार आहे.


नेमारचा चौथा विश्वचषक


ब्राझीलचे मुख्य प्रशिक्षक Carlo Ancelotti यांनी Rio de Janeiro येथे पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. नेमार वर्ल्डकपसाठी पूर्णपणे फीट असल्याचे मुख्य प्रशिक्षकांनी सांगितले.


नेमार आता ३४ वर्षांचा आहे. तो दुखापतीमुळे २०२३ पासून ब्राझीलसाठी खेळला नव्हता. तो आतापर्यंत २०१४, २०१८, २०२२ अशा तीन फिफा वर्ल्डकपमध्ये खेळला आहे. आता तो २०२६ च्या फिफा वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे.ब्राझीलला गट-C मध्ये स्थान मिळाले असून त्यांचा पहिला सामना १३ जून रोजी मोरोक्को (Morocco national football team) विरुद्ध आहे. विरुद्ध होणार आहे. त्यानंतर ब्राझीलचा सामना हैती (Haiti national football team) आणि स्कॉटलंड (Scotland national football team) सोबत होणार आहे.
ब्राझीलचा संपूर्ण विश्वचषक संघ:


गोलकीपर: ॲलिसन बेकर (लिव्हरपूल), एडरसन (फेनरबाचे), वेव्हरटन (ग्रेमियो).


बचावपटू: ॲलेक्स सँड्रो, डॅनिलो, लिओ परेरा (फ्लेमेंगो), ब्रेमर (युव्हेंटस), इबानेझ (अल-अहली), वेस्ले (रोमा), मार्किन्होस (पॅरिस सेंट-जर्मेन), गॅब्रिएल (आर्सेनल), डग्लस सँटोस (झेनिट सेंट पीटर्सबर्ग).


मिडफिल्डर: ब्रुनो गुइमारेस (न्यूकॅसल), कॅसिमिरो (मँचेस्टर युनायटेड), डॅनिलो सँटोस (बोटाफोगो), फॅबिन्हो (अल-इत्तिहाद), लुकास पाकेटा (फ्लेमेंगो).


फॉरवर्ड्स: एंड्रिक (लायन), गॅब्रिएल मार्टिनेली (आर्सेनल), इगोर थियागो (ब्रेंटफोर्ड), मॅथ्यूज कुन्हा (मँचेस्टर युनायटेड), राफिन्हा (बार्सिलोना), विनिसियस ज्युनियर (रिअल माद्रिद), लुईझ हेन्रिक (झेनिट सेंट पीटर्सबर्ग), नेमार (सँटोस), रायन (बॉर्नमाउथ).


मॉड्रिचचा पाचवा विश्वचषक


क्रोएशियाचे मुख्य प्रशिक्षक झ्लात्को दालिच यांनी २६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मॉड्रिचला गेल्या महिन्यात गालाच्या हाडाला दुखापत झाली होती. मात्र, तो १७ जून रोजी इंग्लंड (England national football team) विरुद्धच्या पहिल्या सामन्यापर्यंत फिट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. संघात स्टार फॉरवर्ड Ivan Perišić याचाही समावेश आहे. क्रोएशिया २०१८ विश्वचषकात उपविजेता ठरला होता, तर २०२२ मध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला होता. या वेळी क्रोएशियाला गट-L मध्ये ठेवण्यात आले असून संघ पनामा (Panama national football team) आणि घाना (Ghana national football team) यांच्यासह इंग्लंडविरुद्ध सामने खेळणार आहे.



क्रोएशियाचा संपूर्ण विश्वचषक संघ:


गोलकीपर: डोमिनिक लिवाकोविच, डोमिनिक कोटार्स्की, इवोर पांडुर.


बचावपटू: जोस्को ग्वारदियोल, दुये सालेटा-सार, जोसिप सुतालो, जोसिप स्टैनिसिच, मारिन पोंग्रासिच, मार्टिन एर्लिक, लुका वुस्कोविच.


मिडफिल्डर्स: लुका मॉड्रिच, मातेयो कोवाचिच, मारियो पासालिच, निकोला व्लासिच, लुका सुसिच, मार्टिन बटुरिना, क्रिस्टियन जाकिच, पेटार सुसिच, निकोला मोरो, टोनी फ्रुक.


फॉरवर्ड्स: इवान पेरिसिच, आंद्रेज क्रामारिच, एंटे बुदिमिर, मार्को पासालिच, पेटार मूसा, इगोर माटानोविच.


राखीव खेळाडू (Stand-by Players): लोवरो मायेर, फ्रँजो इव्हानोविच, डिओन ड्रेना बेलजो, इव्हान स्मोलसिच, कार्लो लेटिका, ॲड्रियन सेगेसिच, लुका स्टोज्कोविच।

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम