Tushar Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार गायकवाड यांचे निधन

मुंबई : उत्तर-मध्य मुंबईच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे धाकटे बंधू तुषार एकनाथ गायकवाड (Tushar Gaikwad) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सायंकाळी टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



तुषार गायकवाड (Tushar Gaikwad) हे मुंबई काँग्रेसमध्ये सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळत होते. पडद्यामागे राहून पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांचे जाळे विणणे आणि मुंबईतील काँग्रेसच्या विविध आंदोलनांमध्ये ते नेहमी सक्रिय असायचे. त्यांचे वडील आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष दिवंगत एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण-मध्य मुंबईतून संसदेत आणि राज्य मंत्रिमंडळात दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. २०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले होते. पितृछत्राच्या विरहानंतर अवघ्या पाच वर्षांतच धाकट्या भावाचेही छत्र हरपल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



तुषार गायकवाड (Tushar Gaikwad) यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वपक्षीय नेत्यांनी गायकवाड कुटुंबाचे सांत्वन करत शोक व्यक्त केला आहे. तुषार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मंगळवारी दुपारी १ ते २ या वेळेत विक्रोळी येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, दुपारी २ ते ४ या वेळेत विक्रोळी कोर्टाजवळील, कन्नमवार नगर येथील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन' येथे सर्वसामान्य नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाईल. सायंकाळी टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने