अजित पवार गटातील २२ आमदारांनी घेतली शरद पवारांची गुप्त भेट?

तर्कवितर्कांना उधाण; पक्षाची राजकीय दिशा ठरत नसल्याने संभ्रमावस्था


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींनी आता अत्यंत नाट्यमय वळण घेतले असून, सत्ताधारी अजित पवार गटातील तब्बल २२ आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची 'गुप्त भेट' घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची राजकीय दिशा आणि स्थानिक पातळीवरील बदलती समीकरणे यांमुळे साशंक असलेल्या आमदारांचा यात समावेश आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या २२ आमदारांच्या मतदारसंघांमध्ये आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप किंवा शिवसेनेकडे अत्यंत तुल्यबळ उमेदवार आहेत. किंबहुना, स्थानिक पातळीवर या संभाव्य उमेदवारांना त्यांच्या मुख्य नेत्यांकडून मोठे राजकीय आणि आर्थिक बळ दिले जात असल्यामुळे राष्ट्रवादीच्या या विद्यमान आमदारांची कोंडी झाली आहे. त्यात अजित पवार यांच्या पश्चात पक्षाची नेमकी काय भूमिका असणार, याबाबत स्पष्टता नसल्याने ते संभ्रमात आहेत.


जर या आमदारांनी भविष्यात पक्षांतर करून भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करण्याचे ठरवले, तरीही तिथून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळेलच याची कोणतीही शाश्वती नाही. परिणामी, आपल्या राजकीय भविष्याची शाश्वती मिळत नसल्याने या २२ आमदारांनी थेट शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.


तटकरे-पटेल यांच्या भेटीमुळे विशेष महत्व


अलिकडेच सत्ताधारी राष्ट्रवादीचे दोन मोठे नेते, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात शरद पवारांनी तटकरे आणि पटेलांची प्रशंसाही केली होती. अशावेळी या बड्या नेत्यांच्या भेटीमुळे आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आता २२ आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.दरम्यान, या गुप्त बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, कोणते आमदार यात सहभागी होते किंवा शरद पवारांनी त्यांना काय शब्द दिला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या संदर्भात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या पडद्यामागील हालचालींमुळे सत्ताधारी राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे