Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार


मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-अनुकूल करण्यासाठी ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिली.


मुंबई महानगर प्रदेश मधील प्रवासी जलवाहतूकीसाठी ऑनलाईन तिकीट वितरण, विक्री प्रणाली सुरु करण्याबाबत आढावा बैठक मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री नितेश राणे म्हणाले, वर्सोवा-मढ पारंपरिक तिकीट प्रणाली आधुनिक डिजिटल प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड आणि खासगी भागीदारांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत मासिक, तिमाही आणि वार्षिक डिजिटल पास सुरू करण्याचे नियोजन आहे. पुढील तीन महिन्यांत किमान ५० टक्के व्यवहार ऑनलाइन माध्यमातून करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, दररोज होणाऱ्या सुमारे २२ हजार तिकीट व्यवहारांपैकी किमान ११ हजार व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.



मुंबई महानगर प्रदेशातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता जलवाहतुकीमध्ये डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये, तिकीट प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी तसेच संपूर्ण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मान्सूनपूर्व काळात जलवाहतूक सेवा अधिक वेगाने सुरू करणे. गेटवे ऑफ इंडिया, बेलापूर, एलिफंटा आणि डीसीडी टर्मिनल मार्गांवरील सेवा लवकर सुरू करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.


 

अतिरिक्त महसुलाचे नियोजन


तिकीट प्रणालीमधून जाहिरात आणि कमर्शियल ब्रँडिंगद्वारे अतिरिक्त महसूल निर्माण करण्याचे पर्यायही विचाराधीन आहेत. जेट्टी परिसरात गॅझेबो, डिजिटल माहिती व्यवस्था आणि प्रवाशांसाठी इतर सुविधा उभारण्याचे नियोजनही बैठकीत करण्यात आले आहे. या बैठकीत स्मार्ट ऑटोमॅटिक गेट्स, क्यूआर कोड आधारित प्रवेश व्यवस्था, हँडहेल्ड तिकीट यंत्रणा आणि मल्टी-मोडल पेमेंट प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने