NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध ‘आरसीसी पॅटर्न कोचिंग क्लास’वर पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. जंगली महाराज रोडवरील क्लासला बेकायदेशीर वापर आणि तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचा मिळकत कर थकीत असल्याच्या कारणावरून महापालिकेने सील ठोकले आहे. (NEET Paper Leak Case)


पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक ६ च्या पथकाने ही कारवाई केली. डेक्कन परिसरातील ‘बोरावके टॉवर्स’मधील ‘नालंदा कॅम्पस’च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या क्लासेसवर प्रशासनाने टाळे ठोकत परिसर सील केला. (NEET Paper Leak Case)



महापालिकेच्या माहितीनुसार, संबंधित जागेचा वापर आवश्यक परवानगीशिवाय व्यावसायिक कारणांसाठी केला जात होता. जागेचे मालक आणि आरसीसी मोटेगावकर क्लासेस यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६८ (१)(ओ) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. (NEET Paper Leak Case)


महापालिकेने दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, शिवाजीनगर येथील सि.स. नं. १२५६/२अ, फा. प्लॉट नं. ६२१/२अ मधील निवासी स्वरूपाच्या जागेत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अंतर्गत फेरबदल करण्यात आले होते. त्यानंतर त्या जागेचा वापर कोचिंग क्लाससाठी व्यावसायिक पद्धतीने सुरू करण्यात आला होता.


तपासादरम्यान पहिल्या मजल्यावरील शॉप क्रमांक ९ तसेच दुसरा आणि तिसरा मजला येथे विनापरवाना क्लासेस सुरू असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय या इमारतीवर तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचा मिळकत कर थकीत असल्याचेही महापालिकेने सांगितले आहे. (NEET Paper Leak Case)



कारवाईदरम्यान प्रशासनाने क्लासच्या मुख्य दरवाजावर नोटीस चिकटवत दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील सर्व साहित्य हटवण्याचे आदेश दिले. बाकडी, कपाटे, फ्लेक्स आणि इतर शैक्षणिक साहित्य एका महिन्याच्या आत काढून जागा रिकामी करण्याची मुदत देण्यात आली आहे. (NEET Paper Leak Case)


महापालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की, दिलेल्या मुदतीत जागा रिकामी न केल्यास पोलिसांच्या मदतीने पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच या कारवाईचा संपूर्ण खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल. (NEET Paper Leak Case)



दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या नावामुळे हा क्लास आधीच चर्चेत होता. आता महापालिकेच्या या कारवाईमुळे पुण्यातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak Case)

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा