'Mumbai Tech Week 2026' : मुंबईत भरणार १० हजार 'डेव्हलपर्स' आणि तंत्रज्ञानप्रेमींचा मेळा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'Mumbai Tech Week 2026' : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे भविष्यातील जागतिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम असून, महाराष्ट्र आता देशातील ‘एआय’ नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनण्यासाठी सज्ज झाला आहे. या ध्येयाला गती देण्यासाठी आगामी २९ आणि ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘मुंबई टेक वीक २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून मुंबईत जगभरातील १० हजारांहून अधिक डेव्हलपर्स आणि तंत्रज्ञानप्रेमी एकत्र येणार असून, ओपन एआय, मेटा, एंथ्रॉपिक आणि गूगल क्लाउड यांसारख्या जागतिक पातळीवरील दिग्गज आयटी कंपन्यांचा यात थेट सहभाग असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.



सह्याद्री अतिथीगृहात आयोजित एका विशेष समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुंबई टेक वीक २०२६’ च्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 'टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई' (टीम)तर्फे महाराष्ट्र शासन, आयडीएफसी बँक आणि 'मेटा' यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा सोहळा “इंडिया : आय इन एक्शन” या विशेष थीमवर आधारित असेल. यामध्ये केवळ तांत्रिक चर्चा न होता, विविध क्षेत्रांतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) प्रत्यक्ष वापराचे थेट अनुभव देणारे सादरीकरण केले जाईल. शासन स्वतः प्रशासकीय स्तरावर आणि विविध विभागांमध्ये 'एआय'चा वापर करून कामकाज अधिक सक्षम व गतिमान करत आहे, त्यामुळे या कार्यक्रमात शासनाच्या विविध 'एआय' उपक्रमांचे अनुभवात्मक प्रदर्शन उभारण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.



३० हजार उमेदवारांसाठी २५० हून अधिक रोजगार संधी


'टीम'चे सह-अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्य हर्ष जैन यांनी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ चर्चांपुरता मर्यादित नसून प्रत्यक्ष आर्थिक आणि व्यावसायिक संधी निर्माण करणारा ठरेल. या परिषदेअंतर्गत 'एआय एक्सीलेंस अवॉर्ड्स २०२६', 'अर्ली स्टेज स्टार्टअप शोकेस' आणि 'एआय आधारित जॉब फेअर'चे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष रोजगार मेळाव्यात २५ हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, ३०,००० पेक्षा जास्त इच्छुकांसाठी २५० हून अधिक रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून दिल्या जातील. याशिवाय, मुख्य सोहळ्यापूर्वी मुंबईत १४ वेगवेगळ्या ठिकाणी 'सॅटेलाईट इव्हेंट्स' घेऊन या क्षेत्रातील व्यापक सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.