CSMT : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वरील ब्लॉकला मुदतवाढ

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ च्या पुनर्विकास आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला मुदतवाढ दिली आहे. या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ वर पायाभूत कामे तसेच इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यानुसार, २९ मे पासून सुरू होणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या १० दिवसांच्या कालावधीसाठी शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिकीकरणासाठी हे ब्लॉक अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनातर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात येत असून, प्रवाशांनी सहकार्य करावे आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



दादर येथे शॉर्ट टर्मिनेट:

  1. गाडी क्रमांक १२११२ अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

  2. गाडी क्रमांक ११००२ बल्लारशाह – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस

  3. गाडी क्रमांक १२८१० हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

  4. गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस

  5. गाडी क्रमांक २२१४४ बिदर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

  6. गाडी क्रमांक २२१०८ लातूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

  7. गाडी क्रमांक २२१२० मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस


ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट:

  1. गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म