SRH vs RCB : टॉप-2 साठी आज महासंग्राम! विराटच्या RCB समोर कमिन्सचंच्या हैदराबादच आव्हान

IPL 2026 मधील प्लेऑफची लढत आता अधिक रंगतदार बनली असून आजच्या 67 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे.दोन्ही संघांसाठी हा सामना गुणतालिकेतील टॉप-2 स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

आरसीबी नंबर-1 कायम राखणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू सध्या 13 सामन्यांत 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. संघाचा नेट रनरेटही सर्वोत्तम आहे. आज विजय मिळाल्यास आरसीबीचे टॉप स्थान जवळपास निश्चित होईल आणि प्लेऑफमध्ये त्यांना फायनल गाठण्यासाठी दोन संधी मिळतील.विराट कोहली, रजत पाटीदार आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर संघाची मोठी जबाबदारी असणार आहे.

हैदराबादलाही विजयाची गरज

दुसरी सनरायझर्स हैदराबादने १३ विजयांत १६ गुण मिळवले आहेत. टॉप -2 मध्ये स्थान मजबूत करण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील SRH कडून ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांच्याकडून मोठ्या खेळाची अपेक्षा असेल.



हेड टू हेडमध्ये कोण भारी?

आयपीएल इतिहासात दोन्ही संघांमध्ये २६ सामने आहेत. में हैदराबादने 13 आणि आरसीबीने १२ सामने पुढेले आहे. या टीममधील पहिल्या पहिल्या मात्र आरसीबीने एसआरएच ला ६ विकेट्सने पराभूत केले होते.

पिच रिपोर्ट

राजीव गांधी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. सपाट विकेट आणि लहान बाउंड्रीमुळे चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र सामन्याच्या मध्य षटकांत फिरकी गोलंदाज निर्णायक ठरू शकतात.

संभाव्य प्लेइंग-11

RCB: रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, रसिक सलाम.

SRH: पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, शिवांग कुमार, साकिब हुसेन, ईशान मलिंगा, प्रफुल्ल हिंगे, सलिल अरोरा.
Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून