Accident News: कपडे खरेदीसाठी निघाले अन् वाटेतच घात झाला ! पती, पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Hyderabad National Highway) हिंगणघाट नजीक आज  भीषण अपघात घडला आहे. महामार्गावरील हॉटेल सगुना फॅक्टरीजवळ भरधाव येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मोपेड दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच अंत झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. (Accident News)



काळाने वाटेतच हेरलं अन विपरीत घडलं


सासरवाडीहून कपडे खरेदी साठी निघालेले कुटुंब गजानन वानखेडे (वय 45), पल्लवी वानखेडे (वय 38) आणि आरोही वानखेडे (वय 6) यांचा वाटेतच अपघात घडला आणि या दुर्दैवी अपघातात तिघांचाही करून अंत झाला. वानखेडे कुटुंब हे समुद्रपूर तालुक्यातील कुर्ला येथील रहिवासी होते.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गजानन वानखेडे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह सासरवाडीला आले होते. तिथून ते सर्वजण मोपेड दुचाकीने कपडे खरेदी करण्यासाठी हिंगणघाट शहराकडे जात होते. वानखेडे कुटुंब राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, हॉटेल सगुना फॅक्टरीजवळ विरुद्ध दिशेने अत्यंत भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.



दुचाकीचा चक्काचूर, तिघांचाही मृत्यू


हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला आणि दुचाकीवरील गजानन, पल्लवी व चिमुकली आरोही हे तिघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ रुग्णवाहिका बोलवून तिघांनाही उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.


या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे, अपघातात दगावलेली 6 वर्षांची चिमुकली आरोही ही जुळी बहीण होती. तिची दुसरी जुळी बहीण थोडक्यात बचावली आहे, मात्र आई-वडील आणि बहिणीच्या जाण्याने ती आता पोरकी झाली आहे. या दुर्दैवी अपघाताने कुर्ला आणि हिंगणघाट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि