Crime News : घरात रक्ताचा सडा, १६ वर्षाची मुलगी बेपत्ता; सत्य समोर येताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली

बिहार : प्रेम आंधळं असतं , असं म्हटलं जातं. प्रेमात कोण काय करेल काही सांगता येत नाही. बिहारच्या रोहतास जिल्ह्यात प्रेमप्रकरणाचे असेच खळबळजनक उदाहरण समोर आले आहे. घरात कोंबडा कापून ते रक्त सर्वत्र सांडवले आणि स्वतःचा खून किंवा अपहरण झाल्याचा बनाव रचून १६ वर्षीय मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. १५ दिवस या मुलीचा शोध सुरु होता. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि सत्य समोर आले. या धक्कादायक प्रकारामुळे तिचे कुटुंबच नाही तर पोलीस चक्रावून गेले.


बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील बढीहा गावात ही घटना घडली. ३० एप्रिलच्या रात्री एक अल्पवयीन मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिच्या कुटुंबीयांनी पाहिले, तेव्हा घराच्या अंगणात आणि इतर ठिकाणी रक्ताचे मोठे डाग पडले होते. रक्त पाहून कुटुंबीय घाबरून गेले. मुलीचा घातपात झाल्याच्या भीतीने संपूर्ण कुटुंब हादरले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.




बिहारमध्ये पळाले महाराष्ट्रात आले


या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. १५ दिवस झाले तरी मुलीचा काही शोध लागत नव्हता. अखेर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅकिंगचा आधार घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. ती म्हणजे मुलगी सुरक्षित असून ती स्वतःच्या मर्जीने मयंक कुमार नावाच्या तरुणासोबत पळून गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही पोलिसांना गुंगारा देऊन थेट महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात येऊन राहत होते. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तातडीने महाराष्ट्रात रवाना झाले. त्यांनी भिवंडीतून मुलीला ताब्यात घेतले, तर आरोपी युवक मयंक कुमार याला अटक करण्यात आली आहे. तो अकोढीगोला परिसरातील बांक गावचा रहिवासी आहे.




असा रचला कट


पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित मुलगी आणि मयंक यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, अल्पवयीन असल्यामुळे आणि कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होईल या भीतीने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांना समजू नये आणि कुटुंबीयांचे लक्ष भरकटवण्यासाठी त्यांनी हा कट रचला. योजनेनुसार मुलीने घरात कोंबडा कापून तिचे रक्त अंगणात शिंपडले, जेणेकरून सर्वांना आपला खून किंवा अपहरण झाल्याचा संशय येईल आणि कोणी आपला शोध घेणार नाही. मात्र, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावला, अशी माहिती देहरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुलेश झा यांनी दिली.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर