Solapur Crime : मुलासाठी डायपर आणायला घराबाहेर पडला, काही मिनिटांतच मृत्यू; सोलापुरातील घटनेने खळबळ

सोलापूर : मुलासाठी डायपर (Diaper) आणतो असे सांगून घराबाहेर पडलेल्या २४ वर्षीय तरुणाचा काही वेळातच संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. विजापूर रोड परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, आत्महत्या की हत्या याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.


मृत तरुणाचे नाव सुफियान गुलाम रसूल शेख (वय २४) असे असून तो फॅब्रिकेशन (Fabrication) क्षेत्रात काम करत होता. दीड वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता आणि त्याला एक लहान मुलगाही आहे. २ मे २०२६ शुक्रवारी सायंकाळी सुफियान घरातून मुलासाठी डायपर आणण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही.



नेमकं प्रकरण काय?


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास सुफियान घराबाहेर पडला. घरच्यांना तो काही वेळात परत येईल अशी अपेक्षा होती. मात्र, घरातून निघाल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांतच त्याच्यासोबत काहीतरी अनर्थ घडल्याचे समोर आले. दरम्यान, विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे परिसरात फेरफटका मारत होते. त्यावेळी त्यांना एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसला. मृतदेहाजवळ मोठ्या प्रमाणात रक्त साचले होते. संबंधित तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्याचे हात आणि पाय वाकडे झाल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.



फोनची रिंग वाजली आणि ओळख पटली


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा तसेच प्राथमिक तपास सुरू केला. याचवेळी बराच वेळ होऊनही सुफियान घरी परतला नसल्याने त्याचे कुटुंबीय त्याच्या मोबाईलवर सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. घटनास्थळी तपास सुरू असतानाच मृतदेहाजवळ असलेल्या मोबाईल फोनची रिंग वाजली. पोलिसांनी तो कॉल उचलला. फोनच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या कुटुंबियांनी, “कितना देर हुआ, कहाँ है तू?” अशी विचारणा केली. त्यावेळी पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती दिली. हा प्रकार समजताच कुटुंब्यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणामुळे सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून, सुफियानच्या मृत्यूचे नेमके गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण