Monsoon : मोसमी पाऊस ६ जूनला कोकणात, ७ जूनला पुण्यात पोहोचणार

मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा प्रवास असाच सुसाट राहिल्यास ५ जूनला गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ६ जूनला कोकणात आणि ७ जूनला पुण्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. आता पाऊस महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


भीषण उकाड्याने आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी पावसाच्या आगमनाची दिलासादायक अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, शनिवारी नैऋत्य मान्सूनने नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत यशस्वी प्रगती केली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी वेगाने पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. या आगामी काळात नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन क्षेत्र, बंगालच्या उपसागराचा आणखी मोठा भाग आणि उर्वरित अंदमान समुद्र मान्सूनच्या कक्षेत येण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यत: १ जूनच्या सुमारास पोहोचणारा मान्सून यंदा २६ मे रोजीच केरळ किनारपट्टीवर धडकू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनचा वेग वाढला आहे. विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत