Nashik Crime News : कौटुंबिक वादातून मेहुणीची हत्या , परिसरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मेहुणीचा मेव्हण्याने जीव घेतल्याची घटना याठिकाणी घडलीय. देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात कौटुंबिक वादातून एका नराधम मेव्हण्याने आपल्याच सालीला चाकूने वार करत हत्या केली आहे. छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत महिला (साली) चे नाव आहे, तर श्याम माळी असे मारेकरी मेव्हण्याचे नाव आहे.



कौटुंबिक वाद जीवावर बेतला


आरोपी श्याम माळी आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. हाच कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आणि श्यामची समजूत काढण्यासाठी मयत छाया जाधव या तिचे पती, आई आणि भाऊ यांच्यासह भऊर फाटा येथे आल्या होत्या. सर्वांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, आरोपी श्यामला संताप अनावर झाला आणि त्याने अचानक छाया यांच्या छातीवर चाकूने जोरदार वार केले.


या हल्ल्यात छाया गंभीर जखमी झाल्या. गंभीर जखमी झालेल्या छाया यांना तातडीने कळवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे भांडण सोडवताना छाया यांचा भाऊ सोनू कराटे याच्या दोन्ही हातांवरही चाकूचे वार लागल्याने तो देखील जखमी झाला आहे.



ग्रामस्थांची तत्परता, आरोपी पोलिसांच्या स्वाधीन


घटनेनंतर आरोपी श्याम माळी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, खामखेडा गावाचे लोकनियुक्त सरपंच ॲड. वैभव पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत धाडसाने फरार आरोपी श्याम माळी याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी देवळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा