राज्यात अचानक इंधन मागणीत ३० टक्के वाढ

 मुख्यमंत्र्यांना साठेबाजीचा संशय, जिल्हाधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश


मुंबई : देशभरात गेल्या आठ दिवसांत तिसऱ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य होरपळत असतानाच, राज्यातील ग्रामीण भागात आता गंभीर इंधन टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळेनासे झाल्याने ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. "राज्यात अचानक पेट्रोल-डिझेलच्या मागणीत २० ते ३० टक्क्यांनी झालेली वाढ संशयास्पद असून, यात काहीतरी मोठी गडबड असण्याची शक्यता आहे," अशी शंका व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी अवैध साठेबाजांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.


शनिवारी शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामीण भागातील इंधन टंचाई आणि वाढत्या गर्दीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "बळीराजाला ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल कमी पडू नये, ही सरकारची प्राथमिकता आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत अचानक मागणीत ३० टक्क्यांपर्यंत झालेली वाढ सामान्य नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी इंधनाची अवैध साठेबाजी किंवा काळाबाजार करत असेल, तर त्यांची अजिबात गय केली जाणार नाही."


ग्रामीण भागातील गोंधळ आणि गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने आता 'स्मार्ट' मार्ग निवडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर किंवा कृषी पंपांचे 'आरसी बुक' तपासूनच डिझेल देण्यास सुरुवात केली आहे. हाच पॅटर्न आता राज्यभरात प्रभावीपणे राबवण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. खऱ्या शेतकऱ्यांना त्रास न देता केवळ गरजू लाभार्थ्यांपर्यंतच इंधन पोहोचावे, यासाठी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेलसाठी मोठमोठ्या रांगा


इंधन टंचाईच्या भीतीने वाशीम, हिंगोली, परभणी आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवर कॅन, ड्रम आणि बाटल्या घेऊन नागरिकांच्या मैलोनमैल रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटना घडत आहेत. तर दुसरीकडे, इंधनाच्या दरांचा भडका उडालेलाच आहे. शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी महागले आहे. गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी मोठी दरवाढ ठरल्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढण्याच्या चिंतेने बळीराजा पुरता खचला आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून