Twisha Sharma Death Case : मृत्यूपूर्वी ३ तास पार्लरमध्ये होती ट्विशा; त्या ६० मिनिटांचा पोलीस घेणार शोध

 तविष शर्मा : (Twisha Sharma) मृत्यू प्रकरणात आता नवीन CCTV फुटेज समोर आल्यानंतर तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. या फुटेजमध्ये ३३ वर्षीय ट्विशा आत्महत्येच्या काही तास आधी ब्युटी पार्लरमध्ये जाताना दिसली होती. त्यामुळे तिच्या मृत्यूपूर्वीच्या हालचालींवर आता पोलिस विशेष लक्ष केंद्रित करत आहेत.


माहितीनुसार, १२ मे रोजी ट्विशा एका ब्युटी पार्लरमध्ये गेली होती आणि ती तेथे जवळपास तीन तास होती. CCTV फुटेजमध्ये ती आराम करताना तसेच हेड मसाज घेताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या मते, हे फुटेज अत्यंत महत्त्वाचे असून तिच्या शेवटच्या काही तासांबाबत अनेक माहिती मिळू शकते.


ट्विशाच्या सासरच्या लोकांनीही पोलिसांना ती त्या दिवशी पार्लरमध्ये गेल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही तासांनी ती सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण गळफास असल्याचे नमूद करण्यात आले असले, तरी ट्विशाच्या कुटुंबीयांनी या अहवालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ट्विशाच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. तसेच लग्नानंतर तिचा मानसिक आणि हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ट्विशाचे लग्न सुमारे पाच महिन्यांपूर्वी Bhopal येथील वकील समर्थ सिंह याच्याशी झाले होते. दरम्यान, Madhya Pradesh High Court ने शुक्रवारी ट्विशाच्या मृतदेहाचे दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम करण्यास परवानगी दिली आहे. हे पोस्टमॉर्टम All India Institute of Medical Sciences Delhi (AIIMS Delhi) ची टीम करणार आहे. कुटुंबीयांच्या मागणीनंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.





या प्रकरणात ट्विशाचा पती समर्थ सिंह याच्याबाबतही नवी माहिती समोर आली आहे. तो गेल्या दहा दिवसांपासून फरार होता आणि नंतर त्याने न्यायालयात आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पार्लरच्या मालकाच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर दुसऱ्या दिवशी ट्विशाच्या सासूने त्यांच्याशी संपर्क साधून CCTV फुटेज आणि सर्व्हिसची माहिती मागितली होती. तसेच काही वकीलही फुटेज पाहण्यासाठी पार्लरमध्ये आल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, सासरच्या घरातील CCTV फुटेजमध्ये ट्विशा रात्री सुमारे ७.२० वाजता छताकडे जाताना दिसते. त्यानंतर जवळपास एका तासाने तिचा मृतदेह खाली आणण्यात आल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. या ६० मिनिटांत नेमके काय घडले, याचा आता पोलीस तपास करत आहेत. मृतदेह खाली आणल्यानंतर तिला CPR देण्यात आला होता, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. सध्या ट्विशाचा मृतदेह एम्स भोपाळच्या शवागारात ठेवण्यात आला असून, दुसऱ्या पोस्टमॉर्टम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Ramayan: रामायण 'राइज ऑफ अ लिजेंड' रचणार इतिहास! भारतासाठी ठरला अभिमानाचा क्षण

भारतासाठी अभिमानाचा क्षण! भारतीय सिनेमाचा भव्य आविष्कार आणि दिवाळीचा उत्साह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवत,

Nayyi Naveli : ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; दोन दिवसांत जगभरात 10.3 कोटींची कमाई

Entertainment News: अभिनेत्री यामी गौतमच्या ‘नई नवेली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा

Rakhi Sawant : आत्महत्या प्रकरणात राखी सावंतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट; न्यायालयात गैरहजर राहिल्याने कारवाई

Entertainment News: अभिनेत्री राखी सावंत हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथील न्यायालयाने 2010 मधील

Madhuri Dixit: 'धक धक गर्ल'चा गुलाबी साडीत घायाळ करणारा लूक, पाहा Photos

[caption id="attachment_1067345" align="aligncenter" width="800"] अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य

सिद्धु मुसेवालाच्या छोट्या भावामुळे आई- वडिलांविरोधात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

मुंबई: प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धु मुसेवाला आज या जगात नाही, जरीही तो आज आपल्यात नसला तरीही तो त्याच्या

रेशनवरून वाद, नॉमिनेशनचा फटका! नकुलनंतर आता कोणाची होणार बिग बॉसच्या घरातून एक्झिट?

कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस २०' हा स्पर्धकांमधील अटीतटीच्या स्पर्धेमुळे आणि घरातील वादांमुळे सतत