NEET-2026 Paper Leak Case : अटकेआधी पुरावे जाळले, चॅट्सही डिलीट; मनिषा हवालदारबाबत CBIचा धक्कादायक खुलासा

मुंबई : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनिषा हवालदार यांना अटक केली आहे. तब्बल आठ तास कसून चौकशी केल्यानंतर शुक्रवारी रात्री सदाशिव पेठेतील त्यांच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात आता एक मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला असून, फिजिक्स विषयाच्या प्रश्नसंचाशी संबंधित नोट्स मनिषा हवालदार यांनी जाळून नष्ट केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. सीबीआयच्या चौकशीदरम्यान त्यांनी यासंदर्भात कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.



नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून सीबीआयने (CBI) आतापर्यंत एकूण १२ जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रातील पुणे (Pune), नाशिक (Nashik) आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्राबाहेरील जयपूरमध्येही तपास यंत्रणांनी धाडसत्र राबवत आरोपींना जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या १२ जणांपैकी चार जण पुण्यातील आहेत. शुक्रवारी सीबीआयने मनिषा हवालदार यांना अटक केली असून, फिजिक्सचा प्रश्नसंच लीक करण्यात त्यांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.


तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मनिषा हवालदार यांनी फिजिक्स विषयाच्या प्रश्नसंचाशी संबंधित सर्व नोट्स जाळून नष्ट केल्या. तपास यंत्रणांच्या हाती कोणताही पुरावा लागू नये आणि आपल्यावर संशय येऊ नये यासाठी हा प्रकार केल्याचे सूत्रांनी सांगितले. एवढेच नव्हे तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी मनिषा मांढरे हिच्यासोबत झालेल्या संवादाचे व्हॉट्सअॅप चॅट्सदेखील त्यांनी डिलीट केल्याचे उघड झाले आहे.



सीबीआयच्या चौकशीदरम्यान मनिषानी काही महत्त्वाचे खुलासे केल्याची माहिती समोर आली आहे. फिजिक्सच्या ज्या नोट्स (Notes) विद्यार्थ्यांना देण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्या जाळून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित नोट्सचे फोटो काढून काही विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले होते. हे फोटो पाठवण्यासाठी वापरण्यात आलेले व्हॉट्सअॅप संदेशही (WhatsApp Messages) नंतर डिलीट करण्यात आले. कोणताही डिजिटल किंवा भौतिक पुरावा शिल्लक राहू नये यासाठी त्यांनी विशेष खबरदारी घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, सीबीआयने मनिषा हवालदार यांचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून त्यातील डिलीट करण्यात आलेला डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोबाईलमधून महत्त्वाची माहिती आणि चॅट्स पुन्हा मिळाल्यास या संपूर्ण रॅकेटबाबत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.



मनिषा हवालदारच्या घरातून काय जप्त करण्यात आले?


मनिषा हवालदार यांच्या राहत्या घरावर छापा टाकल्यानंतर तपास यंत्रणांनी अनेक महत्त्वाची कागदपत्रे, संगणकाची हार्ड डिस्क तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त केले आहेत. या सर्व साहित्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असून त्यातून आणखी काही पुरावे मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मनिषा हवालदार या येत्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार होत्या. तर या प्रकरणातील दुसरी आरोपी मनिषा मांढरे हिच्याही सेवाकालातील केवळ काही महिनेच शिल्लक राहिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला एकमेकींच्या चांगल्या परिचयाच्या होत्या. त्यांच्यात नियमित संपर्क होता आणि त्या वारंवार भेटतही असत. त्यामुळे या दोघींमधील संबंध आणि संवादाचा तपास आता सीबीआयकडून अधिक बारकाईने केला जात आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने