Suresh Mapari : वाशिममध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! २९ गाड्यांच्या ताफ्यासह सुरेश मापारींचा भाजपमध्ये भव्य प्रवेश

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आज मुंबईत समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत मोठा राजकीय धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, तब्बल २९ वाहनांच्या ताफ्यासह त्यांनी मुंबई गाठत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे वाशिमच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. (Suresh Mapari)


जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच सुरेश मापारी यांनी हा मोठा निर्णय घेतला. त्यांच्या जागी बालाजी वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर मापारी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करून नाराजी उघडपणे दाखवून दिली. (Suresh Mapari)



मापारी हे काल रात्रीच २०० ते २५० पदाधिकारी, सरपंच, माजी सदस्य आणि कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले होते. २९ गाड्यांचा मोठा ताफा आणि कार्यकर्त्यांची गर्दी यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा रंगली होती. आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटातील ८ नगरसेवकांनीही भाजपचा झेंडा हाती घेतल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Suresh Mapari)



सुरेश मापारी हे वाशिम जिल्ह्यातील प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य, अर्थ व बांधकाम समिती सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ग्रामीण भागात त्यांचे मोठे कार्यकर्ते जाळे असून अनेक गावांमध्ये त्यांचा प्रभाव मानला जातो. (Suresh Mapari)



यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वाशिममधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असून भाजपचे ग्रामीण भागातील बळ आणखी वाढल्याची चर्चा सुरू आहे. (Suresh Mapari)


दरम्यान, खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याने मापारी यांनी हा निर्णय घेतल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याआधी ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने वाशिमच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. (Suresh Mapari)

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर